महाविजयाच्या रथाचे सारथी बना -डॉ.उपेंद्र कोठेकर

0
6

नवेगाव बांध येथे बुथसशक्तीकरन कार्यशाळेचे आयोजन
अर्जुनी मोर.:–आगामी काळ निवडणुकांचा आहे.अत्यंत कसोटी आणि परीक्षेच्या कालखंडात कार्यकर्त्यांनो आपले बलस्थाने ओळखा.कार्यकर्ता पार्टीचा कणा आहे.प्रत्येकाने आपले कर्तव्य सिद्ध करण्याची वेळ आली आहे.ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण द्वारकेचे राजा असूनही पांडवांचे सार्थी बनले आणि कौरवांच्या विरुद्ध पांडवांच्या विजयाचा संकल्प पूर्ण केला.तीच वेळ राष्ट्रावर आली आहे. या नऊ वर्षात देशात प्रत्येक क्षेत्रात,समाज जीवनात मोठे क्रांतिकारी बदल झाले.मोदींच्या नेतृत्वाने विरोधकांचे नामोहरण झाले.सर्व कौरव सेना एकत्र होऊन राष्ट्रहितापेक्षा पक्षहित महत्त्वाचे या संकल्पनेने मोदी विरोधात उभे ठाकले आहेत.या कौरवांच्या विरोधात प्रत्येक कार्यकर्त्यांने महाविजयाच्या रथाचा सारथी म्हणून देशसेवा करण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन विदर्भ संघटन मंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर यांनी केले.
ते नवेगाव बांध येथील बालाजी राईस मिल येथे ( ता.7 )आयोजित बूथ सशक्तिकरण कार्यशाळेचे मार्गदर्शक म्हणून बोलत होते. माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या एक दिवशी कार्यशाळा शिबिरात जिल्हाध्यक्ष येसूलाल उपराडे, जिल्हा समन्वयक वीरेंद्र अंजणकर, जि. प. सदस्य लायकराम भेडारकर,जि.प.सदस्या रचनाताई गहाणे, तालुकाध्यक्ष विजय कापगते,अशोक लंजे,रत्नदीप दहिवले,दीपक कदम प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बडोले यांनी भाजपच्या काळात सर्वाधिक विकासाची कामे झाली. धनाला बोनस,मालगुजारी तलावांचे दुरुस्तीकरण, वर्ग दोन च्या जमिनीवर वर्ग एक, वन हक्काची पट्टे, 11 केव्हीचे सबस्टेशन, शेतकऱ्यांना वीज सुविधा, दवाखाने ,क्षेत्रातील 80 टक्के रस्ते भाजपाने केले. तांडा वस्ती ,मच्छीमारांसाठी योजना,अल्पसंख्यांकांच्या विकासाच्या योजना भाजपने तयार केल्या. एससी,एसटी आणि ओबीसी करता कल्याणकारी योजना आखल्या.मात्र विरोधक या सर्वांना भ्रमित करतात.या सर्व योजना घेऊन आपण जनतेपर्यंत जावे असे आवाहन केले. या कार्यशाळेत उपस्थितांनी अनेक विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायकराम भेंडारकर,संचालन उपसभापती शालिंदर,कापगते आणि आभार चेतन वडगाये यांनी केले.सदर कार्यशाळा बैठकिला गोरेगाव, सडक/ अर्जुनी, अर्जुनी मोर. तालुक्यातील भाजपा पदाधिकारी. जि.प.व पं.स.सदस्य,सर्व आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.