आमदार ठाकरे विरुद्ध नरेंद्र जिचकार वाद, विभागीय आढावा बैठकीत गोंधळ

0
3

नागपूर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष संघटन बांधणीसाठी काँग्रेसने आयोजित केलेल्या आढावा बैठकीत गोंधळ बघावयास मिळाला. शहर अध्यक्ष विकास ठाकरे आणि नरेंद्र जिचकार यांची बाचाबाची झाली. ठाकरे यांच्या हातून जिचकार यांनी माईक हिसकला होता. पक्ष संघटनेची स्थिती जाणून घेऊन ती मजबूत करण्यासाठी विभागीय बैठक महाकाळकार सभागृहात सुरू आहे.

काँग्रेसमध्ये गटतटाचं राजकारण हे अनेकदा बघायला मिळतं. असाच एक प्रकार नागपूरमध्ये घडला आहे. नागपूरमध्ये काँग्रेसच्या बैठकीतत पदाधिकारी आपसांत भिडले आहेत.बैठकीत काँग्रेसचे पदाधिकारी आपआपसांतच भिडले. नाना पटोलेंच्या समोरच ही मारामारी आणि राडा झाला. नाना पटोलेंच्या समोरच पदाधिकाऱ्यांमध्ये हा राडा झाला.नागपुरात आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मंचावर उपस्थित होते. नाना पटोले यांच्यासोबत काँग्रेसचे महत्त्वाचे नेते देखील बैठकीत उपस्थित होते. मात्र नेहमीप्रमाणे अंतर्गत वाद आणि कलह या बैठकीत दिसून आला. प्रदेशाध्यक्षांसमोरच एकमेकांची कॉलर पकडण्यापर्यंत हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूरमध्ये आज आमची बैठक होती. त्या बैठकीत सगळे गट एकत्र आले होते. नरेंद्र जिचकार त्यात आले होते. अध्यक्षांचा माईक नरेंद्र जिचकारांनी घेतला त्यामुळे हा राडा झाला. नरेंद्र जिचकार हा गद्दार आहे त्याला शिक्षा व्हायला हवी होती तरीही तो पक्षात आहे त्याच्यामुळेच आत्ता राडा झाला. भाजपाचे सगळे मित्र याच्याबरोबर असतात हा काँग्रेसशी एकनिष्ठ नाही तरीही पक्षात आहे.काँग्रेस पदाधिकारी वसिम शेख यांनी सांगितलं की विकास ठाकरे बोलू लागले तेव्हा एक कार्यकर्ता जिचकर हा माईक हिसकावू लागला. त्यानंतर राडा झाला. आम्ही त्याला विरोध दर्शवला. आमच्या आमदारांचा माईक हिसकावला तर आम्ही गप्प बसणार का? असंही वसिम यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि नरेंद्र जिचकार यांच्यात जोरदार राडा झाला. यामुळे प्रदेशाध्यक्ष समोर झालेल्या या राड्या नंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसे प्रमुख नेत्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असतानी सुद्धा दोन्ही बाजूने कोणीही ऐकायला तयार नसताना एकमेकांचे समर्थक आपसात भिडले.