गोंदिया,दि.18ः भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी महिला मोर्चाच्या नव्या पदाधिकार्यांची घोषणा केली असून भंडारा महिला जिल्हाध्यक्ष पदावर तुमसर निवासी कल्याणी भुरे यांची तर गोंदिया महिला जिल्हाध्यक्ष तिरोडा तालुका निवासी जिल्हा परिषद सदस्या तुमेश्वरी बघेले यांची नियुक्ती केली आहे.श्रीमती वाघ यांनी आपल्या नव्या दोन्ही जिल्हाध्यक्षांकडून महिलांकरीता चांगले कार्य होतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.