गोंदिया,दि.12-जिल्ह्यात लोकसभा तथा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाला वातावरण अतिशय पोषक आहे. मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावान सैनिक आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका, मी काँग्रेसमध्येच आहोत, असे मत आमगाव-देवरी मतदारसंघाचे आमदार सहसराम कोरेटे यांनी बेरार टाईम्स सोबत बोलतांना व्यक्त केले.इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तसेच समाज माध्यमातून प्रसारित होणाऱ्या बातम्यातून काहीतरी खोडसाळपणा होत आहे. मी काँग्रेसचा निष्ठावंत सैनिक आहे,मला काँग्रेसने जे दिले ते मी विसरु शकत नाही. आमचे कुटुंब काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे. मी सदैव काँग्रेस पक्षाचेच काम करीत राहणार आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाची विचारसरणी, गांधी परिवार, पुरोगामी विचारधारा यासह घट्ट बांधलेले आहोत. अशोक चव्हाण यांच्यासोबत जाण्याचा व भाजप मध्ये प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही.प्रसारमाध्यमांतून प्रसारित होणाऱ्या बातम्या निराधार आणि खोडसाळ असून वृत्त पूर्णपणे निराधार आहे. कार्यकर्त्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये संपूर्ण महाराष्ट्रात सत्ताधारी महायुतीविरोधात वातावरण असून तो दाबण्यासाठी विविध प्रकारचे षडयंत्र रचले जात असल्याची प्रतिक्रिया आमदार सहसराम कोरेटे यांनी दिली.