देवरी येथे संत रविदास महाराज जयंती साजरी

0
4

देवरी, दि.२८ – स्थानिक संत रविदास मंदिरामध्ये संत रविदास महाराज यांची ६४७वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंदिया जि.प.च्या सभापती पुराम या होत्या. उद्घाटक म्हणून नगराध्यक्ष संजय पुराम हे होते. प्रमुख वक्ते म्हणुन राजकुमार पुराम तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका कमला मेश्राम, प्रवीण दहीकर,भोजराज कनोजे महाराज, सुखदेव चौरे, गणेश बिंझलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी नास्तिक तांडेकर, नरेन्द्रं गायकवाड, राजेश बिंझलेकर, मलेश चौरे, मुकेश खरोले यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय संत रविदार मंदीर परिसरात ८ लाख रुपयांचे गट्टु बसविण्याच्या कामाचे उद्घाटन नगराध्यक्ष संजय उईके यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर तांडेकर, संचालन संतोष तुरकर व आभार प्रदर्शन डिलेश्वरी बिंझाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रभु मनघटे, श्यामकुवर बिंझाडे, सुरेश तांडेकर, बापुसींग बरैया, सुनिल बिंझाडे, संतोष तांडेकर, भोजराज बिंझलेकर, देवराज जगणे, प्रकाश बिंझाडे, राजेश बिंझाडे, विलाश बिंझाडे, सुभाष बिंझलैकर, प्रविण मेश्राम, रविदास बिंझलेकर, कल्पना तांडेकर, डिलेश्वरी बिंझाडे, रेखा तुरकर सहकार्य केले. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.