गोंदिया- ७ मार्च २०२४ ला सकाळी ११.०० वाजता सडक अर्जुनी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा गोंदिया – भंडारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या कार्यकर्ता मेळावा व किसान संमेलन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली कार्यालय, गोंदिया येथे माजी आमदार राजेंद्र जैन, विनोद हरिणखेडे, कुंदन कटारे, सौ पुजा अखिलेश सेठ यांच्या उपस्थितीत गोंदिया तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मेळाव्या संदर्भात पूर्व नियोजन बैठक घेण्यात आली व सदर मेळाव्या करीता जास्तीत जास्त संख्येने तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहतील यांचे नियोजन करण्यात आले. तसेच तालुक्यातील जिल्हा परिषद निहाय बुथ कमिटीचा आढावा घेण्यात आला.
यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, विनोद हरीणखेडे, कुंदन भाऊ कटारे, पूजा अखिलेश सेठ, केतन तुरकर, रजनी गौतम, कीर्ती पटले, गणेश बरडे, घनश्याम मस्करे, सरला चिखलोंडे, अखिलेश सेठ, रविकुमार पटले, शिवलाल जमरे, शंकरलाल टेंभरे, राजू एन जैन, चंदन गजभिये, विजय रहांगडाले, पदमलाल चौरिवार, टी एम पटले, चंद्रकुमार चव्हाण, करण टेकाम, चंद्रकुमार चुटे, जितेंद्र बिसेन, कैलास नागपुरे, केवल रहांगडाले, रमेश रहांगडाले, दुर्योधन मेश्राम, राजेश्वर रहांगडाले, प्रभुदास पटले, राजेश नागपुरे, पंकज चौधरी, नितीन टेंभरे, तिर्थराज नारनवरे, योगेश बिंझाडे, योगेश कन्सरे, रामेश्वर चौरागडे, आरजू मेश्राम, भागेश्वर बिजेवार, अशोक गौतम, तीलकचंद पटले, रतिराम हरीणखेडे, उमाशंकर ठाकूर, चिमनलाल मेंढे, योगराज गौतम, प्रफुल ऊके, पवन धावडे, पप्पू पटले, धरमसिंग टेकाम, हितेश पताहे, रिताराम लिल्हारे, प्रशांत मिश्रा, लंकेस पटले, गंगाराम कापसे, तीर्थराज हरीणखेडे, सुनील पटले, शैलेश वासनिक, दिलिप डोंगरे, गुणवंत मेश्राम सहीत मोठया संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.