रामटेकमध्ये तब्बल दहा वर्षांनी काँग्रेसचा खासदार?

0
18
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नागपूर : काँग्रेस विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा थेट सामना झालेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघांतून काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली आहे. पाच फेरीनंतर ७३ हजार ५५० मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे सुरुवातीच्या मतमोजणीचा कल महाविकास आघाडीच्या बाजून असल्याचे दिसत आहे.या मतदारसंघातून सध्या काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे आघाडीवर असून प्रत्येक फेरीत आघाडीवर आहेत. परंतु, अंतिम निकालाचे चित्र स्पष्ट होण्यासाठी आणखी काही तास प्रतिक्षा करावी लागणार आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासून चर्चेचा ठरला आहे. काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे याचं जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्यामुळे ऐनवेळी त्यांच्याऐवजी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना मैदानात उतरावे लागले.

तर बर्वेच्या विरोधात काँग्रेसचे आमदार पण राजू पारवे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करुन उमेदवारी मिळवली. त्यामुळे इथे शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चां रंगल्या होत्या. तर दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवाराला आघाडीतील मित्रपक्षांनी चांगली साथ दिल्याचे पाहायला मिळाले. सध्या काँग्रेसचे बर्वे आघाडीवर असले तरीही रामटेकचा गड कोण जिंकणार हे मतमोजणीच्या सर्व फेऱ्या पूर्ण झाल्याशिवाय सांगता येणार नाही