अर्जुनी मोर.-अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र आदिवासी,नक्षलप्रभावीत अतिदुर्गम व संवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जातो.निसर्गाची मुक्त उधळण असलेला हा क्षेत्र धार्मीक,सामाजीक,व पर्यटन स्थळांनी गजबजलेला आहे.तसेच हा क्षेत्र संपुर्ण शेतीवर अवलंबुन आहे.अशा या विविधतेने नटलेल्या अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचे संदर्भात आमदार राजकुमार बडोले यांनी प्रयत्न सुरु केले आहे.त्यासंदर्भात त्यांनी मुंबई मंत्रालयात विवीध मंत्र्यांच्या भेटी घेत चर्चा केली.नवनिर्वाचित आमदार ईंजी.राजकुमार बडोले हे माजी मंत्री असुन त्यांना सन 2009 पासुन मंत्रालयाचा जवळुन अभ्यास आहे. त्यांनी सन 2014 ते 2019 पर्यंत राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणुन काम करतांना सामाजीक न्याय विभाग काय असते हे संपुर्ण महाराष्ट्राला अवगत केले.तसेच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणुन पालकत्व काय असते हे जिल्ह्याला दाखवुन दिले होते. आमदार व मंत्री म्हणुन काम करीत असताना अर्जुनी मोरगांव विधानसभा क्षेत्राकडे त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले.आता नव्या उमेदीने या क्षेत्राचा विकास कसा साधता येईल या दृष्टीने आमदार बडोले यांनी आपले प्रयत्न सुरु केले आहेत.
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र हा आदिवासी नक्षलप्रभावीत अतिदुर्गम व संवेदनशील भाग असल्याने या क्षेत्रात निधी व विकासाची कामे कसी आणता येतील त्या अनुषंगाने आमदार राजकुमार बडोले यांनी महाराष्टाचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील,ओबीसी बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे,आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची मुंबई मंत्रालयात भेट घेऊन त्यांना मंत्रीपदाच्या व नववर्षाच्या शुभेच्छा देवुन अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील विवीध विषयांवर चर्चा करुन मंत्रीमहोदयांकडुन सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.