गोंदिया- तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यानी काही कारणांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नुकतीच घर वापसी करण्यात आली. खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतल्याने पक्षाला मजबुती मिळणार आहे. तालुक्यातील रायपूर येथिल माजी सरपंच व सेंट्रल कृषकचे केवल रहांगडाले, सेंट्रल कृषक चे संचालक मंगल ठाकरे, पांढराबोडी येथिल योगराज लिल्हारे, दासगांव माजी उपसरपंच व विद्यमान ग्राम पंचायत सदस्य अंचल गिरी, ग्रामपंचायत सदस्य राजेश भास्कर चौडे, मुंड़ीपार (बटाना) येथिल विट्ठलराव करडे यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसोबत माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत पक्षात घर केली. प्रवेशामुळे पक्षाला बळकटी मिळणार आहे. पक्षाची विचारधारा जन माणसात पोहचविण्यासाठी कटिबद्ध राहून कार्य करण्याचे काम करणार आहोत असे त्यांनी म्हटले आहे. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेत वृद्धी होवून पक्ष मजबुत होईल. पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्व प्रवेशितांचे अभिनंदन केले.