गोंदिया,दि.२३::राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवार कशा वाढवता येईल व जास्तीत जास्त लोकांना पक्षाच्या प्रवाहात आणण्याचे काम आपण सर्वांनी करावे, सभासद नोंदणीच्या उपक्रमात पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावातील चौकात चावडीवर बसून अधिकाधिक लोकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद बनवायचे आहे असे आज एन एम डी महाविद्यालय सभागृह गोंदिया येथे संपन्न झालेल्या सभासद नोंदणी अभियान मध्ये मार्गदर्शन करतांना खासदार प्रफुल पटेल बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोंदिया जिल्हा सभासद नोंदणीला खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. जास्तीत जास्त संख्येने सभासद नोंदणी करुन पक्षाला मजबुती देण्यात आपला प्रयत्न केला पाहिजे, पक्ष मजबूत असेल तरच आम्हाला पण आपल्या सक्षमतेने कार्य करता येते, काही लोक नाराज व पक्षात येण्यास इच्छुक असल्यास पक्षात घ्या व पक्ष वाढवा असे मार्गदर्शन खासदार प्रफुल पटेल यांनी केले. सभासद अभियान शुभारंभ प्रसंगी आमदार राजकुमार बडोले, माजी आमदार राजेंद्र जैन व जिल्ह्यातील सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, सर्व तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.