42.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय सर्वसमावेशक विकासाचा मार्ग दाखवणारा अर्थसंकल्प : पंकज रहांगडाले, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद...

सर्वसमावेशक विकासाचा मार्ग दाखवणारा अर्थसंकल्प : पंकज रहांगडाले, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया

0
50

blank

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा राज्याच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग दाखवणारा आहे. सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या हितासाठी ₹2 लाखांपर्यंत कर्जमाफी आणि वेळेत कर्जफेड करणाऱ्यांसाठी ₹50 हजार प्रोत्साहन योजना जाहीर करण्यात आली आहे. कृषी पंपांसाठी वीज अनुदान आणि शेती विकासासाठी विविध योजनांमुळे कृषी क्षेत्राला बळ मिळणार आहे.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत दरमहा ₹1500 आर्थिक मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता तो असाच सुरू राहील असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

शिक्षण क्षेत्रातही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देण्याची योजना मजबूत करण्यात आली आहे. तसेच राज्यातील ऐतिहासिक व सामाजिक स्मारकांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, ज्यामुळे सांस्कृतिक वारसा जपण्यास मदत होईल.

आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली आहे. नागरिकांना दर्जेदार उपचार मिळावेत, ग्रामीण रुग्णालये सक्षम व्हावीत आणि आरोग्य सेवा सर्वांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

blank