Home राजकीय काँग्रेससह भाजपला महिलांची एलर्जी सेनेसह राष्ट्रवादीने दिले महिला उमेदवार

काँग्रेससह भाजपला महिलांची एलर्जी सेनेसह राष्ट्रवादीने दिले महिला उमेदवार

0

गोंदिया-महिला सशक्तीकरणाचे राजकारण करणारे आणि महिलांच्या स्वाभिमानासाठी देखावा करणाèया काँग्रेस आणि भाजपने जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी एकही उमेदवार न दिल्याने गोंदिया-भंडारा या प्रमुख पक्षांना महिलांची एलर्जी असल्याची भावना जिल्ह्यातील महिलांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे, शिवसेना आणि राष्ट्रवादीने महिला उमेदवार उभे दिल्याने महिलांच्या सन्मानाची या पक्षांनी दखल घेतल्याविषयी महिलांमध्ये आशा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातून महिला आमदार निवडून विधानसभेत गेल्याशिवाय महिलांच्या प्रश्नांना वाचा फुटणार नाही, यासाठी महिलाशक्तीने एकजूट होण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.
गोंदिया जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघाकरीता येत्या १५ आक्टोबरला निवडणूक होऊ घातली आहे. उमेदवारी देताना सर्वच राजकीय पक्षांनी महिलांबाबतीत उदासीन धोरण आखल्याचे चित्र आहे. ज्या काही महिलांना उमेदवारी मिळाली, त्या महिलांना अखेरच्या क्षणी म्हणजे कुणी उमेदवारी घ्यायला तयार नाही म्हणूनच दिली की काय, अशी अवस्था आहे. ४ विधानसभा क्षेत्रांचा आढावा घेतला, तर राष्ट्र‹वादी, शिवसेना आणि बसपनेच महिला उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.
गोंदिया विधानसभा मतदारसंघ हा महत्वाचा मतदारसंघ असून या मतदारसंघात भाकपवगळता कुठल्याही मोठ्या राजकीय पक्षाने उमेदवारी महिलांना देण्याचे धाडस दाखविले नाही. काँग्रेस,भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस सेनेकडे महिलांची मोठी संख्या असतानाही महिला उमेदवारांना डावलण्यात आले. तिसरी आघाडी असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने कुडव्याच्या सरपंच करुणा गणवीर यांना उमेदवारी दिली आहे.
तिरोडा मतदारसंघात भाजपकडे सीता रहागंडाले यांच्या सारख्या मातब्बर महिला आघाडीच्या नेत्या असतानाही त्यांना उमेदवारी मिळाली नाही. काँग्रेस,सेनेने सुद्धा याकडे लक्ष दिले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसने जि.प.सदस्या राजलक्ष्मी तुरकर यांना उमेदवारी देऊन आपण महिलांना संधी दिल्याचे दाखविले. ४ पैकी १ जागा देऊन तीर मारल्याचा आव राष्ट्रवादी करीत असली तरी अखेरच्या क्षणी कुणी तयार न झाल्यानेच ही उमेदवारी देऊन राजलक्ष्मी तुरकर यांचा या निवडणुकीतून राजकीय बळी घेण्याचाच प्रयत्न होतो की काय, याकडे लक्ष लागले आहे.
अर्जुनी मोरगाव मतदारसंघात भाजप,काँग्रेस व राष्ट्रवादीकडून महिलांनी उमेदवारी मागितली. परंतु, त्या पक्षातील नेत्यांनी त्या महिलांकडे दुर्लक्ष केल्याने अखेरच्या क्षणी युती तुटल्याने शिवसेनेने मात्र भाजपच्या जि.प.सदस्या किरण कांबळे यांना आपल्या तंबूत ओढून त्यांना उमेदवारी देऊन अर्जुनी मोरगावच्या विधानसभा निवडणुकीला चांगलाच रंग भरला आहे.किरण कांबळे यांनी गेल्या निवडणुकीत अपक्ष राहून १० हजार मते घेतली होती. यावेळी शिवसेनेच्या चिन्हावर रिंगणात असल्याने आणि नेहमी संपर्कात असल्यानेच शिवसेनेला संजीवनी मिळाली आहे. किरण कांबळेच्या रूपाने या मतदारसंघात शिवसेना आपले स्वप्न साकारण्याची तयारी करीत आहे. काँग्रेसच्या वालदे,भाजपच्या रूपाली टेंभुर्णे यांना मात्र हिरमुसले व्हावे लागले आहे.
आमगाव मतदारंसघाचीही परिस्थिती अशीच असून भाजप, सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महिलांकडे दुर्लक्ष केले. या मतदारसंघात बहुजन समाजपक्षाने शारदा उईके यांना उमेदवारी देऊन महिलांना संधी दिली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version