Home राजकीय आमदार निधीतून मतदारसंघाचा विकास केला-आ.बडोले

आमदार निधीतून मतदारसंघाचा विकास केला-आ.बडोले

0

नवेगावबांध- अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने २००९ च्या निवडणुकीत मी महाराष्ट्राच्या विधानसभेत पोचलो. त्या जनतेच्या भावनांचा आदर आणि विकासाची कास ओळखून आपल्या स्थानिक विकास निधीतून पहिल्या पंचवार्षिक कार्यकाळात आपण मतदार संघाचा विकास केल्याचा दावा आमदार राजकुमार बडोले यांनी केला.
समाजमंदिर, रस्ते, आरोगयसेवा, सभामंडप, हातपंप,सिमेंट रस्ते,बुद्धविहार आदीसोबतच रखडलेल्या सिचनाचे प्रकल्प व पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याचे अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार इंजि.राजकुमार बडोले यांनी मतदारसंघातील आपल्या केशोरी,चिखली,नवेगावबांध आदी गावांना दिलेल्या भेटीदरम्यान मतदारांशी संवाद साधताना सांगितले.
देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने चांगले कार्य करण्यास सुरवात केली असून अवघ्या १०० दिवसातच महागाईसुद्धा आटोक्यात आणली. qसचनासाठी केंद्राकडून सहकार्य मिळत असून गोंदिया-कोहमारा -वडसा या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देऊन आपल्या मतदारसंघाच्या विकासाचे मार्ग मोकळे केल्याचेही ते म्हणाले. यावेळी बोलताना आमदार बडोले म्हणाले की, झाशीनगर उपसा सिचन योजनेतून नवेगावबांध तलावात येत्या मार्च २०१५ पर्यंत पाणी पाडून शेतीला पाणी मिळवून देण्याकरिता प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे वन व कृषी उत्पादनावर आधारित औद्योगिक विकासाकरिता लघुउद्योगांना चालना देऊन रोजगार निर्मितीकरिता प्रोत्साहन देण्यासाठी कट्टीबध्द आहे
इटियाडोह धरणाचे पाणी झरी उपसा qसचन योजनेद्वारे बोंडगावदेवी परिसरातील शेतीला पोचविणे, नरेगा योजनेतून शेतीची कामे व्हावी यासाठी राज्यसरकारकडे प्रयत्न केले असून आदिवासी बहुल भागातील मागास प्रवर्गातील विद्याथ्र्यांना व बेरोजगारांना शैक्षणिक सोयी उपलब्ध करून देण्यासाठी डव्वा येथे शासनाच्या वतीने मागासवर्गीय निवासी वसतिगृह व शाळा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येत्या १५ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पुढच्या पाच वर्षात विकासाची कामे करण्यासाठी पुन्हा संधी देण्याचे आवाहन केले.

Exit mobile version