Home राजकीय फडणवीसांकडे चातुर्य नाहीः राणे

फडणवीसांकडे चातुर्य नाहीः राणे

0

मुंबई -देवेंद्र फडणवीस प्रामाणीक आहेत पण त्यांच्याकडे सरकार चालवण्यासाठी अनुभव, कौशल्य आणि चातुर्य नाही. एकनाथ खडसे सोडले तर त्यांच्या मंत्रिमंडळात कोणीही प्रभावी मंत्री नाही. त्यामुळे हे मंत्रिमंडळ अतिशय कमकुवत असून दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याची क्षमता फडणवीस सरकारमध्ये नाही, अशी टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केलय.

विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर मुंबईत पत्रकार परिषद घेत नारायण राणे पहिल्यांदाच समोर आले. प्रचार प्रमुख म्हणून निवडणुकीतल्या पराभवाची नैतिक जबाबदारी मी घेतो, असं राणेंनी स्पष्ट केलं. पण सत्तेत आलेल्या भाजपच्या फडणवीस सरकारच्या धोरणावर टीका केली. ‘भाजपने निवडणुकीत टोल बंद करू असं सांगितलं होतं पण आता फडवणीसांची भाषा बदलली आहे. त्यांनी घुमजाव केलं आहे. तसंच मिहान प्रकल्पातील उद्योगांना सबसीडीत वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेऊन फडणवीस हे शेतकऱ्यांवर अन्याय करत आहेत’, असा आरोप राणेंनी केला. ‘बहुजन समाजाचा मुख्यमंत्री हावा हे आता बोलून काही उपयोग नाही, खडसे कमी पडले’, असा चिमटा राणेंनी काढला. ‘येणाऱ्या सहा महिन्यात जनतेला कळेल की पूर्वीचं आघाडी सरकारच चांगलं होतं’, असा दावा त्यांनी केला.

error: Content is protected !!
Exit mobile version