Home Top News केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, २१ नव्या मंत्र्यांचा समावेश

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, २१ नव्या मंत्र्यांचा समावेश

0

नवी दिल्ली – मनोहर पर्रिकर, जे.पी.नड्डा, मुक्तार अब्बास नक्वी यांच्यासह २१ नव्या चेह-यांचा मंत्रिमंडळात समावेश करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार करण्यात आला आहे . १४ राज्यमंत्री, चार कॅबिनेट मंत्री आणि तीन राज्यमंत्र्यांनी(स्वतंत्र प्रभार) यावेळी शपथ घेतली.राष्ट्रपती भवनामधील दरबार हॉलमध्ये रविवारी हा शपथविधीचा हा सोहळा पार पडला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या सर्व मंत्र्यांना शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती सुमित्रा महाजन, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्री, भाजपचे खासदार यावेळी उपस्थित होते.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह जे.पी.नड्डा, सुरेश प्रभू, वीरेंद्र सिंह चौधरी यांनी केंद्रीय कॅबिनेटमंत्रिपदाची शपथ घेतली तर बंडारु दत्तात्रय, राजीव प्रताप रुडी, महेश शर्मा यांनी राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार)पदाची शपथ घेतली. यासोबतच गिरीराज सिंग, मोहन कुंदारिया, सनवर लाल जट, हरिभाई पार्थीभाई चौधरी, राम कृपाल यादव, मुख्तार अब्बास नक्वी, हंसराज आहिर ,डॉ. रामशंकर कटेरिया , वाय.एस.चौधरी(इंग्रजीमध्ये शपथ घेतली) ,जयंत सिन्हा ,राज्यवर्धन सिंग राठोड , बाबूल सुप्रियो(इंग्रजीमधून शपथ घेतली), साध्वी निरंजन ज्योती, विजय सम्पला यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

कॅबिनेट मंत्री

»मनोहर पर्रिकर,
»जे.पी नड्डा,
»सुरेश प्रभू,
»वीरेंद्र सिंह चौधरी

राज्यमंत्री

»गिरीराज सिंग
»मोहन कुंदारिया
»सनवर लाल जट
»हरिभाई पार्थीभाई चौधरी
»राम कृपाल यादव
»मुख्तार अब्बास नक्वी
»हंसराज आहिर
»डॉ. रामशंकर कटेरिया
»वाय.एस.चौधरी
»जयंत सिन्हा
»राज्यवर्धन सिंग राठोड
»बाबूल सुप्रियो
»साध्वी निरंजन ज्योती
»विजय सम्पला

राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार)

»बंडारु दत्तात्रय
»राजीव प्रताप रुडी
»डॉ. महेश शर्मा

error: Content is protected !!
Exit mobile version