
गोंदिया,दि.05 : कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे संपूर्ण उद्योगधंदे, व्यापार-व्यवसाय बंद असल्यामुळे नागरिकांचे उत्पनाचे सर्व स्रोत बंद पडले आहेत. अशात वीज वितरण कंपनीद्वारे ग्राहकांना अवाढव्य वीज बिल देण्यात आले आहे. त्यामुळे तीन महिन्याचे वीज बिल माफ करावे, शेतकèयांना कमीत कमी १८ तास विज पुरवठा करण्यात यावा व मागील ३ वर्षाचे थकीत वीज बील माफ करण्यात यावे आदी मागण्यासंदर्भात ४ ऑगस्ट रोजी भाजपाच्या वतीने जिल्हाधिकाèयांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
या मागणीचे निवेदन ४ ऑगस्ट रोजी जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ कादंबरी बलकवडे यांच्याशी सविस्तर चर्चा करुन मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन देऊन मागण्यासंदर्भात तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली. निवेदनानुसार, शासनाकडून दुधाला सरसकट १० रुपये प्रतीलिटर अनुदान देऊन दुध भुकटीसाठी प्रति किलो ५० रुपये अनुदान व दुध खरेदीचा दर ३० रुपये प्रती लीटर करण्यात यावा. जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकèयांना तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी, पीक विमा उतरविण्याची मुदत वाढविण्यात यावी, शासकीय आधारभूत धानखरेदी केंद्रावर विक्री झालेल्या धानाचे बोनस व उन्हाळ्यात विकलेल्या धानाचे चुकारे अनेक शेतकèयांना अद्याप मिळालेले नाही. तसेच प्रशासन व बँकेच्या चुकांमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकèयांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ मिळाला नाही, बँकांनी चुका दुरुस्त करुन निधी त्वरित देण्यात यावा. यासह जिल्ह्यातील नागरिक व शेतकèयांच्या अनेक समस्या व प्रश्नांचा समावेश आहे. या वेळी प्रामुख्याने प्रदेश सचिव माजी आ. संजय पुराम, आमदार विजय रहांगडाले, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी आ. हेमंत पटले, माजी आ. रमेश कुथे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी जिप अध्यक्ष नेतराम कटरे, जिल्हा महामंत्री संघटन वीरेंद्र अंजनकर, संतोष चौहान, शहर अध्यक्ष सुनील केलनका, संजय कुलकर्णी, प्रफुल अग्रवाल, जयंत शुक्ला, संजय मुरकुटे, स्वानंद पारधी, गोल्डी गावंडे, सुरेश चंदनकर, अशोक जयसिंघानी, महेश चौरे, महेंद्र पुरोहित आदी उपस्थित होते.