चंद्रपुर: बी आर ए कराटे क्लब मुल, जिल्हा चंद्रपूर तर्फे “४थे राज्य स्तरीय खुले कराटे चॅम्पियनशिप – २०२२” तालुका क्रीडा संकुल मुल येथे आयोजित करण्यात आले. या स्पर्धेमध्ये विविध जिल्ह्यातून खेळाडूंनी भाग घेतला होता. चंद्रपूर येथील मार्शल आर्ट अँड स्कुल गेम्स असोसिएशन मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये यश प्राप्त केले.
या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकाचे मानकरी ठरलेले खेळाडू रिदम कोटकर, शाश्वत वैरागडे , तरुण वाढिले त्याच प्रमाणे रोप्य पदकाचे मानकरी विराज पुणेकर, स्वरनिक पारोजी, सौम्यता शृंगारपवार, भानुप्रताप नंदाने, मित झोडे, निहारिका शाहारकर मानकरी ठरले. त्याचप्रमाणे कांस्य पदकाचे मानकरी सुमेध धावरे, क्रिश माहासाहेब, शीतल मेश्राम, सिद्धांत रामटेके, हर्षल रामटेके, तन्मय खोब्रागडे, प्रयास अडपवार, स्वरूप मोहुरले, लक्की नंदाने, निधिष वानखेडे, योगिता दुर्गे हे ठरलेत.
तसेच ब्लॅक बेल्ट चॅम्पियनशिप मध्ये सुरज गिरडकर व दीपरत्न मडावी यांनी सहभाग घेतला.सर्व खेळाडूने आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक “विनोद पुणेकर” व आपल्या आई-वडिलांना दिले.या स्पर्धेमध्ये खेळाडूंन करिता मास्टर विनोद पुणेकर,आशिष रिंगणे, कैलाश बिडकर, अरविंद पडवेकर, सौ.रोशनी पुणेकर, नवनीत मुन, निर्धार आसुटकर, संतोष यनगंधलवार आदी लोकांनी परिश्रम घेतले.