खेलो इंडिया : क्रीडा सुविधांची माहिती ३० जूनपर्यंत मागविली 

0
5
वाशिम,दि.२८- केंद्र शासनाने ” खेलो इंडिया ” पोर्टल कार्यान्वीत केले आहे.जिल्ह्यातील विविध शासकीय/खाजगी शाळा, महाविद्यालय,संस्था,तसेच संघटना यांच्याकडे उपलब्ध असलेल्या क्रीडा
सुविधांची माहिती शासनाच्या खेलो इंडिया पोर्टलवर अपलोड करण्याचे कळविले आहे.त्यानुसार शासकीय/ खाजगी शाळा, महाविद्यालय, संस्था तसेच संघटनाकडे उपलब्ध क्रीडा सुविधांची माहिती वेब पोर्टलवर अपलोड करावयाची आहे.
        विविध क्रीडांगणे,स्पोर्टस कॉम्प्लेक्स,जलतरण तलाव,इनडोअर हॉल इत्यादी सुविधांची माहिती पत्ता, गुगल मॅप लोकेशन,मोबाईल नंबर, क्रीडा सुविधा, फोटो, प्रशिक्षकाचे नाव,खेळ,जन्म तारीख व शैक्षणिक पात्रता इत्यादींची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,वाशिम येथे ३० जुन रोजी सायंकाळी ५ पर्यंत प्रत्यक्ष अथवा [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवावी.असे जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी कळविले आहे.