Home क्रीडा जिल्हास्तरीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत निवासी शाळा मूर्री येथील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जिल्हास्तरीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत निवासी शाळा मूर्री येथील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

0

गोंदिया :- गोंदिया डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन आणि माऊंट लिटरा झी स्कूल, गोंदिया यांच्या सयुंक्त विद्यमानाने गोंदिया जिल्हा चेस चॅम्पियन्सशिपचे आयोजन करण्यात आले होते.
चेस चॅम्पियन्सशिपचे उद्घाटन पंकज अग्रवाल यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोंदिया डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे सचिव मुकेश बारई यांनी केले. कार्यक्रमा दरम्यान माऊंट लिटरा झी स्कूल, गोंदियाच्या मुख्याध्यापिका यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना सांगितले की “हारणे आणि जिंकणे हा खेळाचा भाग आहे. परंतू हार पत्करली म्हणून आयुष्यात सगळे संपले असे होत नाही, त्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होऊ न देता पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात करावी आणि सतत काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत रहावे.” असा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धा सुरु होण्यापूर्वी पंकज अग्रवाल यांनी स्पर्धकांना बुद्धिबळ या खेळाचे नियम समजावून सांगितले. त्यानंतर स्पर्धेला अधिकृतरीत्या सुरुवात झाली.
सदर स्पर्धेत गोंदिया तालुक्यातील कार्यरत अनु. जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, नंगपुरा मूर्री येथील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला”
स्पर्धेत एकूण 107 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यात शाळेतील एकूण 10 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यापैकी गगन कोल्हटकर, अल्पेश धनविजय, समीर वासनिक, प्रिन्स सहारे, भूपेंद्र बावणे इत्यादी विद्यार्थी रैंकिंग मध्ये पाहिल्या 10 मध्ये आले. तर उर्वरित विद्यार्थी रैंकिंग मध्ये पहिल्या 20 मध्ये आले.
सदर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत एकूण 6 राऊंड खेळविण्यात आले. त्यात निवासी शाळेच्या सर्व दहाही विद्यार्थ्यांनी राऊंड 6 पर्यन्त मजल मारली. पहिल्या राऊंड पासूनच विद्यार्थ्यांनी शानदार विजयी सलामी दिली. राऊंड 6 च्या समाप्ती नंतर गोंदिया डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन तर्फे स्पर्धा समाप्ती व बक्षिस वितरण समारोह चे आयोजन करण्यात आले.
बक्षिस वितरण समरोह मध्ये गोंदिया डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष पटेल  यांच्या हस्ते स्पर्धेच्या विजेत्या विद्यार्थ्यांना मेडल आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
सदर स्पर्धेत, अग्रवाल , पालंदुरकर , बिसेन , बगमारे , श्यामकुंवर यांनी पर्यवेक्षकाची भूमिका पार पडली तर गायधने सर यांनी संगणकीय गुणतालिका अपडेट करण्याचे अत्यंत महत्वाचे काम केले. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हावे यासाठी सहाय्यक शिक्षक एस. बी. बगमारे  आणि मयूर श्यामकुंवर यांनी मेहनत घेतली. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांसाठी दुपारी भोजनाची व्यवस्था करून गृहपाल डी. एस. खराबे यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच BVG सुरक्षारक्षक संजय गोंडाणे व महेंद्र टेंभेकर यांचेही महत्वाचे सहकार्य लाभले. शाळेचे मुख्याध्यापक आर. पी. इठुले  तसेच शाळेच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले. अशाप्रकारे जिल्हास्तरीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा मोठ्या उत्साहात यशस्वीरित्या पार पडली.

Exit mobile version