राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त एकता दौडचे यशस्वी आयोजन

0
14

गोंदिया दि. 31, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, गोंदिया नेहरू युवा केंद, शिक्षण विभाग, भारत स्काऊट गाईड, राष्ट्रीय सेवा योजना एन. एम. डी. कॉलेज व जिल्हा विविध क्रीडा संघटनांच्या विद्यमाने 31 ऑक्टोंबर 2022 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनी “राष्ट्रीय एकता दिवस” कार्यक्रमाअंतर्गत ‘एकता दौड’ (UNITY RUN) जिल्हा क्रीडा संकुल मरारटोली गोंदिया येथे यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली.

 सर्व प्रथम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले व राष्ट्रीय एकता दिवस शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड होते, तर प्रमुख अतिथी म्हणुन श्रृती डोंगरे युवा अधिकारी, चेतना ब्राम्हणकर जिल्हा समन्वयक भारत स्कॉऊड गाईड, विनायक डोंगरवार, रवी रहांगडाले, धनंजय भारसाकळे, कीष्णा बहेकार, किशोर तायडे प्रामुख्याने उपस्थित होते.

 ‘एकता दौड’ मध्ये गोंदिया जिल्हयातील सरासरी 250 धावपटू सहभागी झाले होते. एकता दौडला घनश्याम राठोड व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथुन प्रारंभ झाला.

राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त अध्यक्षीय भाषनातून श्री. राठोड  यांनी सांगितले की, देशाची सुरक्षा व अखंडता तसेच सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी एकात्मतेची नितांत आवश्यकता आहे. ” यावेळी चेतना ब्राम्हणकर, श्रृती डोंगरे, विनायक डोंगरवार यांची समर्पक भाषणे झालीत. राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधुन स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

          कार्यक्रमाचे संचालक ए. बी. मरसकोले कीडा अधिकारी यांनी केले तर आभार नाजुक उईके, राज्य कीडा मार्गदर्शक यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा कार्यालय चे शिवचारण चौधरी, सुमित सुर्यवंशी, जयश्री भांडारकर तसेच विविध क्रीडा संघटनेचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. विशाल ठाकूर अंकुश गजभिये, ऋतुराज यादव, केशव मेश्राम यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रीय एकता दिवस शपथ घेऊन साजरा

गोंदिया दि. 31, 31 ऑक्टोबर 2022 रोजी इंदिरा गांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती कार्यक्रम, राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेवुन शासकिय वैद्यकिय महाविद्यालय गोंदिया येथे साजरा करण्यात आला. अधिष्ठाता, डॉ. कुसुमाकर घोरपडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

सदर कार्यक्रमात अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी इंदिरा गांधी यांचे प्रतिमेस तर विभागप्रमुख ईएनटी, डॉ. अपुर्व पावडे यांनी वल्लभभाई पटेल यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर इंदिरा गांधी व वल्लभभाई पटेल यांच्या व्यक्तीमत्वाबाबत अधिष्ठाता यांनी आपले विचार व्यक्त केले. इंदिरा गांधी या स्वतंत्र भारताच्या पहिल्या व एकमेव महिला पंतप्रधान होत्या. त्यांचे पुण्यतिथी निमित्त देशात संकल्प दिवस साजरा करण्यात येतो. तसेच वल्लभभाई पटेल यांचेबाबत विचार व्यक्त करीत असतांना सांगितले की, वल्लभभाई पटेल यांना सरदार म्हणुनही संबोधले जाते. देशाचे पहिले गृहमंत्री म्हणुन त्यांनी पदभार पाहला. देशाच्या अखंड भारताचे त्यांनी स्वप्न पाहिले आणि पुर्णत्वास आणण्याकरीता पुर्ण प्रयत्न केले. भारताची एकता, अखंडतेसाठी त्यांनी कार्य केले.

 सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त अधिष्ठाता, डॉ.कुसुमाकर घोरपडे यांनी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ कार्यक्रमात उपस्थित सर्व अधिकारी- कर्मचारी यांना दिली. सदर जयंती कार्यक्रमात विभागप्रमुख कान-नाक-घसा डॉ. अपूर्व पावडे, विभागप्रमुख शरीररचनाशास्त्र डॉ. विनायक रुखमोडे, सहा. प्राध्यापक बधिरीकरणशास्त्र डॉ. रमेश सुगंध, वैद्यकिय अधिकारी डॉ. शिल्पा पटेरिया, लघुलेखक शिवम घारड, विजय जाधव, पंकज वटटी, प्रफुल फेरण, तसेच विकम लांजेवार, गोपाली खोटे समाजसेवा अधिक्षक व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात विक्रम लांजेवार, समाजसेवा अधिक्षक यांनी संचालन केले. तसेच सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता समाजसेवा अधिक्षक विक्रम लांजेवार, गोपाली खोटे यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाकरीता राकेश बन्सोड यांनी मोलाचे सहकार्य केले.