Home क्रीडा 55 वी राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेत भंडारा जिल्ह्यातील संघ सहभागी 

55 वी राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेत भंडारा जिल्ह्यातील संघ सहभागी 

0
पवनीच्या खो खो खेडाळूंची पुन्हा एकदा भरारी
पवनी-  55 वी राज्यस्तरीय खो खो स्पर्धा विदर्भ खो खो असो.च्या निर्देशानुसार दिनांक 11 ते 13 नोव्हेबर 2022 ला यवतमाळ जिल्ह्यातील मित्र क्रीडा मंडळाच्या मैदानावर पांढरकवडा येथे मित्र क्रीडा मंडळ व खेतानी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विदर्भातील 11 जिल्ह्यातील संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेतून राष्ट्रीय खो खो स्पर्धेकरिता विदर्भ खो खो संघाची निवड करण्यात येते.
  भंडारा जिल्हा खो खो असोशियेशन तर्फे 07 नोव्हेंबरला भंडारा जिल्ह्याचा पुरुष गटाचा संघाची निवड भंडारा जिल्हा खो खो असोशियेशनचे सचिव पुरूषोत्तम सेलोकर व भंडारा जिल्हा खो खो असो. च्या पदाधिकार्यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली. यामध्ये भंडारा जिल्ह्याचा खो खो संघामध्ये पवनीतील डोन्ट वरी ग्रुपचे खेडाळू धृप बोटकुले, मिलिंद तूळानकर, मंगेश बावनकर, ऋषिकेश भांडक्कर, राहुल निंबेकर, अक्षद आसई व भंडारा तालुक्यातील प्रणय ईश्वरकर, आदित्य ठवकर, स्वप्नील कुंभारे, दिनेश मारबते, अतुल ईश्वरकर, प्रेम मारबते, प्रज्वल चोपकर, सारंग घुघुस्कर, गुड्डू केवट व संघ व्यवस्थापक म्हणून डोन्ट वरी ग्रुप व सिटिझन फोरम चे संघर्ष अवसरे आणि संघ प्रशिक्षक म्हणून डोन्ट वरी ग्रुप व सिटिझन फोरम चे योगेश बावनकर होते.
 ही स्पर्धा तीन दिवसीय होती व यामध्ये पवनीच्या डोन्ट वरी ग्रुप ची चौफेर प्रशांसा होत असून खेडळूंना जिल्हास्तरीय ते राज्यस्तरीय पर्यंत खेळविले त्याकरिता डोन्ट वरी ग्रुप व सिटिझन फोरम चे योगेश बावनकर, संघर्ष अवसरे, निखिल शहारे, धृप बोटकुले, निखिल ढमदे, आशुतोष रायपूरकर, श्रेयश कुर्झेकर उल्हास सावरकर, वेदांत भोयर यांनी परिश्रम घेतले.
पवनी येथे डोन्ट वरी ग्रुप तर्फे खो खो चे मोफत प्रशिक्षण सक्सेना शाळेचा मैदानावर देत असून डोन्ट वरी ग्रुप चा मुलांना जिल्हास्तरीय राज्यस्तरीय व तसेच राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी देत असून डोन्ट वरी ग्रुप व सिटिझन फोरम च्या पदाधिकऱ्यांनी विदर्भ खो खो असोसिएशन चे सचिव सुधीर निंबाळकर आणि सर्व पदाधिकारी व तसेच जिल्हा खो खो असोसिएशन चे सचिव पुरूषोत्तम सेलोकर व सर्व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले.

Exit mobile version