राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत आदित्य जगतापने पटकवाले सुवर्णपदक

0
16

गोंदिया,दि.19ः- झारखंड राज्यातील रांचि य़ेथे नुकत्याच पार पडलेल्या CBSE राष्ट्रीय (नेमबाजी) शूटिंग स्पर्धेत मूळचा गोंदिया येथील व सध्या नागपूर येथील ऑरेंज सिटी स्पोर्ट शूटिंग अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या आदित्य अनंत जगतापने पुरुष युवक गटात 400 पैकी 398 गुण घेत सुवर्ण पदक पटकाविले.आदित्यने यापुर्वी सुध्दा अनेक स्पर्धामध्ये राष्ट्रीयस्तरावर आपले नावलौकिक केले आहे.राष्ट्रीय CBSE स्पर्धेत नागपूरच्या भवन्स शाळेचे प्रतिनिधित्व आदित्य जगतापने प्रशिक्षक अनिल पांडे यांच्या मार्गदर्शनात करीत दैदिप्यमान यश मिळविले.आदित्यच्या या य़शाबद्दल गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी आदित्यचे अभिनंदन केले आहे.