शालेय क्रीडा स्पर्धेतून दर्जेदार खेळाडू निर्माण होतात – निखिल पिंगळे

0
11

राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल व रोलबॉल क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन

गोंदिया,दि.3 : शालेय क्रीडा स्पर्धेमधून दर्जेदार खेळाडू निर्माण होण्याची प्रक्रिया होत असून यामधून भविष्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू घडणार आहेत. स्पर्धेत सहभागी होतांना खेळाडूंनी आत्मविश्वासाने स्पर्धेत उतरावे. सातत्यपुर्ण सराव केल्यास स्पर्धेत निश्चितपणे यश मिळेल, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले.

          क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने दिनांक 1 ते 3 फेब्रुवारी 2023 पर्यंत क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमीत्ताने जिल्हा क्रीडा संकुलात 2 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल/ रोलबॉल क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

          शालेय स्पर्धेचा उद्देश विशद करुन खेळाडूंनी नियमांचे तंतोतंत पालन करावे तसेच स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यात सगळ्यांचे सहकार्य अपेक्षीत आहे, अशी आशा प्रास्ताविकेतून जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी व्यक्त केली.

          कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी प्रोग्रेसिव्ह इंग्लीश स्कुल गोंदिया यांनी अतिशय आकर्षक नृत्य सादर करुन उपस्थितांचे लक्ष वेधले.

          स्पर्धेच्या प्रारंभी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचा ध्वज फडकविण्यात आला. राष्ट्रीय खेळाडू अवदुत दोरगे यांनी खेळाडूंना शपथ दिली.

          कार्यक्रमास प्रा.डॉ.अस्वीन चंदेल एस.एस.जे.सिनियर कॉलेज अर्जुनी/मोर, बाळू बाळबुध्दे नागपूर बास्केटबॉल संघटना, रवि कुलकर्णी सरस्वती विद्यालय नागपूर, प्रा.विनोद गोस्वाती नांदेड बास्केटबॉल संघटना, पी.जेम्स फादर चावळा हायस्कुल वडसा, शैलेंद्र पारासर उपाध्यक्ष म.रा. रोलबॉल असोसिएशन नागपूर, अमित पाटील सहसचिव म.रा. रोलबॉल असोसिएशन कोल्हापूर, डॉ.आनंद मकवाना सचिव रोलबॉल संघटना गोंदिया, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे प्रामुख्याने उपस्थित होते.

        स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक एन.एस.उईके,  स्काऊट-गाईडचे जिल्हा समन्वयक चेतना ब्राम्हणकर व पराग खुजे, धनंजय भारसाकळे, विकास कापसे, श्री. राऊत, श्री. सागर, अंकुश गजभिये, अतुल बिसेन, विनेश फुंडे, शिवचरण चौधरी, किसन गावड, आकाश भगत, नरेंद्र कोचे, वसंत विहिरघरे, शेखर बिरणवार, जयश्री भांडारकर तसेच संबंधीत खेळाचे क्रीडा शिक्षक व पंच यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेचे संचालन क्रीडा अधिकारी ए.बी.मरसकोले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे यांनी मानले.