Home क्रीडा इंदूर कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव:ऑस्ट्रेलियाने 76 मिनिटांत 76 धावांचे लक्ष्य गाठले

इंदूर कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव:ऑस्ट्रेलियाने 76 मिनिटांत 76 धावांचे लक्ष्य गाठले

0

ट्रेव्हिस हेड व मार्नस लाबुशेन यांच्या संयमी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताविरोधातील बॉर्डर-गावस्कर मालिकेतील तिसरा कसोटी सामना 9 गड्यांनी आपल्या नावे केला आहे. या विजयामुळे कांगारूंच्या संघाने मालिकेत 2 विरुद्ध 1 असे पुनरागमन केले आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 9 ते 13 मार्चदरम्यान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाईल.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने चौथ्या डावात मिळालेले 76 धावांचे लक्ष्य अवघ्या एका गड्याच्या मोबदल्यात सहज पार केले. भारतीय फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर उस्मान ख्वाजाला शून्यावर पव्हेलियनमध्ये पाठवून भारतीय चाहत्यांच्या आशा पल्ल्वित केल्या. भारतीय स्पिनर्सने सुरुवातीच्या 11 षटकांत प्रभावी गोलंदाजी केली. पण 12 व्या ओव्हरमध्ये स्थिती बदलली. बॉल बदलताच स्थितीही बदलली. ट्रेव्हिस हेड व मार्नस लाबुशेन नाबाद परतले.

दुसऱ्या दिवशी 16 विकेट पडल्या, भारताचा दुसरा डाव 163 वर आटोपला
गुरुवारी दुसऱ्या दिवसाच्या खेळात ऑस्ट्रेलियाने 156/4 धावसंख्येने सुरुवात केली. 186 पर्यंत संघाच्या केवळ 4 विकेट होत्या, मात्र 197 पर्यंत संपूर्ण संघ ऑलआऊट झाला होता. भारताने 2 सत्रांपर्यंत फलंदाजी केली आणि 163 धावांत सर्व 10 विकेट गमावल्या.

चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक 59 धावा केल्या, तर श्रेयस अय्यर 26, रविचंद्रन अश्विन 16, विराट कोहली 13 आणि रोहित शर्मा केवळ 12 धावा करू शकले. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लिऑनने सर्वाधिक 8 विकेट घेतल्या.

भारत पहिल्या डावात 109 धावांत ऑलआऊट झाला होता. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 88 धावांची आघाडी मिळाली. आता भारताच्या 163 धावा झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला 76 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

अशा प्रकारे भारताच्या विकेट पडल्या

पहिली : शुभमन गिलला पुढे जाऊन मोठा शॉट खेळायचा होता आणि नॅथन लियॉनचा चेंडू चुकला. चेंडू स्टंपला लागला.

दुसरी : नॅथन लायनने भारतीय कर्णधार रोहित शर्माला LBW केले.

तिसरी : मॅथ्यू कुह्नेमनने विराट कोहलीला LBW केले.

चौथी : रवींद्र जडेजा नॅथन लायनचा तिसरा बळी ठरला. लायनने त्याला एलबीडब्ल्यू केले.

पाचवी : उस्मान ख्वाजने स्टार्कच्या चेंडूवर अय्यरचा शानदार झेल टिपला.

सहावी : श्रीकर भरतला लायनने बोल्ड केले.

सातवी: नॅथन लायन एलबीडब्ल्यू अश्विन.

आठवी: स्टीव्ह स्मिथने लायनच्या चेंडूवर पूजाराचा अप्रतिम झेल पकडला.

नववी: एक मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात उमेश यादवला डीप मिडविकमध्ये कॅमेरून ग्रीनने पकडले.

दहावी: मोहम्मद सिराज लायनचा आठवा बळी ठरला. त्याला लायननेच बोल्ड केले.

आता सत्रानुसार दुसऱ्या दिवसाचा खेळ पहा
पहिले : भारतीय गोलंदाज चमकले, ऑस्ट्रेलिया 197 धावांपर्यंत आटोपला

दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र भारतीय गोलंदाजांच्या नावावर राहिले. ऑस्ट्रेलियन संघाने 41 धावा करताना सहा विकेट गमावल्या. उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी तीन बळी घेतले. पीटर हँड्सकॉम्ब (19) आणि कॅमेरॉन ग्रीन (21) यांच्याशिवाय खालच्या फळीतील एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही.

दुसरे : पुजाराची सावध खेळी, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे वर्चस्व
दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. मात्र, पुजाराने सावध खेळी करत संघाला सावरले. या सत्रात टीम इंडियाने 66 धावांत चार महत्त्वाच्या विकेट गमावल्या. चहापानाच्या वेळी भारतीय संघाची धावसंख्या ७९/४ होती. पुजारा 36 धावांवर नाबाद राहिला. गिल, जडेजा, रोहित आणि कोहली मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरले.

तिसरे : नॅथन लियॉनची भेदक गोलंदाजी, भारत ऑलआऊट
दिवसाच्या शेवटच्या सत्रात नॅथन लिऑनची भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याने भारताच्या शेवटच्या 6 पैकी 5 विकेट घेतल्या. भारतीय फलंदाजांना केवळ 84 धावांची भर घालता आली.

Exit mobile version