अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धेत वन परीक्षेत्र अधिकारी पवन जाधव यांना धनुर्विद्येत सुवर्ण पदक 

0
16
वाशिम दि.13- पंचकुला (हरियाणा) येथे दिनांक ९ ते १४ मार्च २०२३ दरम्यान सुरु असलेल्या अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धेत धनुर्विद्या या क्रीडा प्रकारात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत अकोला वन्यजीव परीक्षेत्राचे (काटेपूर्णा- कारंजा सोहळ अभयारण्य) वन परीक्षेत्र अधिकारी पवन जाधव यांनी सुवर्ण पदक प्राप्त केले.
        या स्पर्धा पंजाब विद्यापीठ मैदानावर पार पडल्या.पवन जाधव यांनी १८० गुणांपैकी १७० गुण प्राप्त करत सुवर्ण पदक प्राप्त केले.के. चंदन केरला यांनी १६५ गुण प्राप्त करत रौप्य पदक तर एम. जी. पसाया गुजरात यांनी १६० गुण प्राप्त करत कांस्य पदक प्राप्त केले. पारितोषिक वितरण समारंभ करिता विनित गर्ग पीसीसीएफ हरियाणा,कोमल शर्मा आयएफएस हरियाणा व इतर मान्यवर उपस्थित होते.
 पवन जाधव यांनी याआधीसुद्धा धनुर्विद्येत अनेक राष्ट्रिय स्पर्धेत पदके प्राप्त केले असून राष्ट्रिय विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहेत.या स्पर्धेच्या पदक तालिकेतील महाराष्ट्र संघाचे हे दुसरेच सुवर्ण पदक आहे. पवन जाधव यांच्या यशाबद्दल के अर्जुना उपवनसंरक्षक अकोला ,अनिल निमजे विभागीय वन अधिकारी वन्यजीव अकोला,अकोला वन विभागातील सर्व वन परीक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.