Home क्रीडा क्रीडा शिक्षकांना मिळणार क्रीडा विषयक नाविण्यपूर्ण प्रशिक्षण

क्रीडा शिक्षकांना मिळणार क्रीडा विषयक नाविण्यपूर्ण प्रशिक्षण

0

गोंदिया, दि.10 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यात आठ दिवसाचे क्रीडा प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचे आधुनिक प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येत आहे. या क्रीडा प्रशिक्षण शिबिरात खेळामधील बदललेले आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या पध्दती व नियम, खेळांमधील कौशल्ये, नविन खेळांची ओळख व खेळांची शास्त्रोक्त माहिती वेळोवेळी शिक्षकांना करुन देणे आवश्यक आहे. याकरीता शासनाने संपुर्ण महाराष्ट्रात क्रीडा शिक्षकांसाठी नाविण्यपुर्ण प्रशिक्षणाचे आयोजन करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

       याकरीता राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर्स शिबिरातून जिल्ह्यातील 10 क्रीडा शिक्षक तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण घेऊन आलेले आहेत. तज्ञ प्रशिक्षक व अद्ययावत ज्ञान असलेल्या तज्ञांमार्फत तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर क्रीडा शिक्षकांच्या ज्ञानामध्ये भर पडावी व वेळोवेळी क्रीडा क्षेत्रामध्ये होणारे बदल अवगत करण्यासाठी तसेच जिल्ह्यातील शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना योग्य क्रीडा प्रशिक्षण ‍मिळण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील 100 क्रीडा शिक्षकांचे अद्ययावत निवासी प्रशिक्षण शिबीर दिनांक 16 ते 23 मे 2023 पर्यंत जिल्हा क्रीडा संकुल, गोंदिया येथे आयोजित करण्यात आलेले आहे.

         सदर शिबिराचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी व क्रीडाप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Exit mobile version