Home क्रीडा क्रीडा शिक्षकांनी नाविण्यपूर्ण प्रशिक्षण घेऊन शास्त्रोक्त पध्दतीने खेळाडू घडवावे – जिल्हाधिकारी

क्रीडा शिक्षकांनी नाविण्यपूर्ण प्रशिक्षण घेऊन शास्त्रोक्त पध्दतीने खेळाडू घडवावे – जिल्हाधिकारी

0

गोंदिया, दि.18 :- राज्य शासनाच्या क्रीडा धोरणाअंतर्गत क्रीडा शिक्षकांकरीता राबविण्यात येणाऱ्या नाविण्यपूर्ण प्रशिक्षणाच्या माध्यमातून शास्त्रोक्त पध्दतीने खेळाडू घडवावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष चिन्मय गोतमारे यांनी केले.

          जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, तालुका क्रीडा अधिकारी ओमकांता रंगारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

        क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार-प्रसार व जोपासना करण्याच्या दृष्टीने गोंदिया जिल्ह्यात पोषक क्रीडा वातावरणाची निर्मिती करणे आवश्यक आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

        क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा क्रीडा परिषद गोंदिया यांचे विद्यमाने क्रीडा शिक्षकांसाठी क्रीडा प्रशिक्षण शिबीर दिनांक 16 ते 23 मे 2023 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथे आयोजित करण्यात आले आहे.

        यावेळी मास्टर ट्रेनर्स पी.पी.खोब्रागडे, अमन नंदेश्वर, खुशाल पिंजरघरे, टी.ए.आलोत, मिलींद रहांगडाले, अविनाश बंसोड, जितु पालांदूरकर, मनिषा शहारे यांचा मान्यवरांच्या हस्ते कॅप देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर स्वयंसिध्दा राज्यस्तरीय महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीर अकोला येथे गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रविना बरेले, खुशबू बांगडकर, पल्लवी हेमणे, नितू भागडकर, इशिता कटरे, केशवी ब्राम्हणकर, साक्षी शिवणकर, शिल्पा गायधने, मंगला गौतम, नुपूर झिंझरिया यांचेही मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व कॅप देऊन स्वागत करण्यात आले.

        प्रास्ताविकेतून जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी क्रीडा प्रशिक्षणाचा उद्देश व कार्यक्रमाची रुपरेखा सांगून ‘‘हस्तपुस्तिका’’ ही क्रीडा शिक्षकांसाठी विविध खेळातील आधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी मार्गदर्शिका ठरेल असे विचार व्यक्त केले.

       सदर जिल्हास्तरीय क्रीडा प्रशिक्षण शिबिरात गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यातील 100 क्रीडा शिक्षक सहभागी झालेले आहेत.

       कार्यक्रमाचे सुत्रसंचालन क्रीडा अधिकारी ए.बी.मरसकोले यांनी केले तर उपस्थितांचे आभार राज्य क्रीडा मार्गदर्शक एन.एस.उईके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनंजय भारसाकळे, विनेश फुंडे, शिवचरण चौधरी, किसन गावळ, आकाश भगत व जयश्री भांडारकर यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version