विभागीय रायफल शूटिंग स्पर्धेकरिता क्रांती तुरकरची निवड

0
8

तिरोडा:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा दि.28 ऑगस्ट 2023 ला घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथील विद्यार्थी क्रांती मोरेश्वर तुरकर अंडर 17 वयोगटात आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला. या विद्यार्थ्यांची नागपूर येथे होणाऱ्या विभागीय रायफल शूटिंग स्पर्धेकरिता निवड झाली आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य एस पी ठाकरे यांच्या उपस्थितीत क्रांती तुरकर या विद्यार्थ्यांच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.