राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत सारंग चाफ़ले याची अष्टपैलू कामगिरी

0
6

नागपूरदि. 11 :- राजस्थानच्या उदयपूर शहरात नुकत्यच पार पडलेल्या तिस-या राष्ट्रीय दिव्यांग टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या अत्यंत अटीतटीच्या झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबई संघाने विदर्भ संघाचा अवघ्या दोन धावांनी पराभव केला असला तरी महावितरणचा कर्मचारी असलेल्या सारंग चाफ़ले याने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांची मने जिंकली. राजस्थानच्या उदयपूर शहरात दि. 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टॉंबर 2023 दरम्यान झालेल्या तिस-या राष्ट्रीय दिव्यांग़ टी-20 क्रिकेट स्पर्धेत विदर्भ संघाने आपल्य पहिल्या सामन्यात हैदराबाद संघाचा 10 धवांनी पराभव केला. या सामन्यात सारंगने 7 धावा केल्या आणि सोबत 2 बळी घेतले. दुस-या सामन्यात विदर्ण बंघाने उत्तरप्रदेश संघाचा 3 धावांनी पराभव केला. यात या सामन्यात सारंगने 10 धावा केल्या आणि सोबत 2 बळी घेतले. चंदीगड विरोधातील तिसरा सामना विदर्भाने 43 धावांनी जिंकला, यात सारंगने 39 धावा करीत 4 बळी घेत सामनाविराचा पुरस्कार पटकाविला.चौथ्या सामन्यात विदर्भ संघाने गुजरातचा 42 धावांनी पराभव केला, या सामन्यात देखील सारंगने 2 बळी घेतले. पाचव्या सामन्यात विदर्भाने उत्तराखंडचा तब्बल 9 गडी राखून विजय मिळविला. या सामन्यात दुखापतीमुळे सारंग खेळू शकला नाही. उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यात विदर्भाने पंजाब संघावर 5 गड्यांनी विजय मिळवला. या सामन्यात देखील सारंगने अवघ्या 18 चेंडूत 31 धावा आणि 1 बळी घेतला. तर उपांत्य फ़ेरीत मुंबई संघाने विदर्भाचा अवघ्या दोन धावाने पराभव केला  मात्र या सामन्यात देखील सारंगने 11 धावा करीत 2 बळी सुद्धा घेतले.

    या स्पर्धेत सारंग चाफ़ले याने आपल्या अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करीत सर्वांची मने जिंकली आहेत. सारंग याने दिव्यांग क्रिकेट विश्वात भारताकडून म्हणून भरीव कामगिरी केली असून जन्मतः पोलीओमुळं एक पाय अधु असलेला सारंग क्रिकेटसोबतच शैक्षणिकदृष्ट्याही स्वावलंबी आहे. अष्टपैलू म्हणून आंतरराष्ट्रीय नावलौकीक असलेला सारंग हा महावितरणच्या बुटीबोरी विभागातील 33/11 केव्ही निलडोह उपकेंद्र येथे यंत्रचालक म्हणून कार्यरत आहे. त्याने आपल्या अप्रतिम खेळाच्या जोरावर हे स्थान बळकट केले आहे.

सारंगच्या या कामगिरीबद्दल महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, नागपूर शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, बुटीबोरी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफ़ुल्ल लांडे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, विदर्भ क्रिकेट दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष संजय भोसकर यांचेसह अनेकांनी सारंगचे अभिनंदन केले आहे.