अर्जुनी मोर. :– तालुक्यातील मानवता विद्यालय व कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय बोंडगाव देवी येथील अनिकेत संजय लंजे या विद्यार्थ्यांची तिहेरी उडी मध्ये राज्यस्तरावर निवड झाली आहे.
दि.13/10 ते 14/10/2023 ला विभागीय क्रिडा संकुल मनकापुर नागपुर येथे झालेल्या मैदानी स्पर्धेत अनिकेत संजय लंजे याने तिहेरी उडी मधे द्वितीय क्रमांक व हर्षवर्धन विनायक रामटेके याने तृतीय क्रमांक पटकवला.
राज्यस्तरावर निवड झालेल्या अनिकेत लंजे या विद्यार्थ्यांची संस्था सचिव यशवंत लंजे, माजी प्राचार्य तथा संचालक एन.एस.डोंगरवार, प्राचार्य गोपिकिशन भोयर,क्रिडा मार्गदर्शक टि.आर.कापगते, एस.एस.नाकाडे,पर्यवेक्षक एस.के.डोंगरवार, प्रा.उल्हास गोबाळे,ए.एम.कोटांगले,जे.बी.चुटे,आर व्ही.समरीत आदींनी अभिनंदन केले.