3 डिसेंबर आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमीत्त दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

0
5

गोंदिया, दि.1 : समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद गोंदिया व दिव्यांगांच्या शासनमान्य विशेष शाळा/कर्मशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने 2 डिसेंबरला सकाळी 11 वाजता पोलीस मुख्यालय मैदान, कारंजा (गोंदिया) येथे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प.समाज कल्याण सभापती पुजा सेठ यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे असतील, तर विशेष अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख अतिथी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जि.प.मुख्य लेखा वित्त अधिकारी जनार्धन खोटरे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांची उपस्थिती असणार आहे.

         3 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता इंदिरा गांधी स्टेडियम ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्या पर्यंत दिव्यांग विद्यार्थ्यांची प्रभातफेरी निघणार आहे. तसेच सकाळी 11 वाजता पोलीस मुख्यालय मैदान कारंजा (गोंदिया) येथे सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षिस वितरण समारोह आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प.समाज कल्याण सभापती पुजा सेठ यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले असतील तर विशेष अतिथी म्हणून जि.प.उपाध्यक्ष यशवंत गणवीर, अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे, महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, कृषि व पशुसंवर्धन सभापती रुपेश कुथे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याण समितीचे सदस्य विजय उईके, हनुवंत वटी, शशेन्द्र भगत, किशोर महारवाडे, अंजली अटरे, निशा जनबंधू, अनंदा वाढीवा, प्रिती कतलाम, सविता रंगारी, छबु उके, राधिका धरमगुळे तर मुख्य अतिथी म्हणून जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील उपस्थित राहणार आहेत.

        तरी जिल्ह्यातील नागरिकांनी दोन्ही दिवसाच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून दिव्यांग बांधवांचा उत्साह द्विगुणीत करावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी शंकर वैद्य यांनी केले आहे.