मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरूवारी नागपूरमध्ये झाला. या सामन्यात भारतीय संघाने ४ विकेट राखत विजय मिळवला.या वनडे सामन्यात इंग्लंड संघाने टॉस जिंकताना पहिल्यांदा फलंदाजी करत २४९ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ३३ षटकांत ३ विकेट गमावत २२० धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने ५.४ षटकांत ३१ धावा करण्यासाठी ३ विकेट गमावल्या.
सामन्यात २ धावा करणाऱ्या रोहितने म्हटले, एक टीम म्हणून आम्हाला सगळ्या गोष्टी योग्य करायच्या होत्या. मला वाटते की प्रत्येकाने योग्य बॉक्स टिक करावा. बॅटिंग असो वा बॉलिंग सगळ्यांनी योग्य करा. दरम्यान,सामन्याच्या शेवटी शेवटी आम्ही ज्या विकेट गमावल्या त्या गमावल्या नाही पाहिजे होत्या.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारताने सहज विजय मिळवला आहे. शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि अक्षऱ पटेल यांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने विजयासाठी मिळालेले २४९ धावांचे आव्हान ४ विकेट आणि ६८ बॉल राखत पूर्ण केले.
इंग्लंडकडून सलाीमीवीर फिल सॉल्टने ४३ धावा केल्या. तर कर्णधार जोस बटलरने ५२ धावा करत संघाला अडीचशेच्या जवळपास नेण्याचा प्रयत्न केला. त्याला जॅकॉब बेथेलनेही चांगली साथ दिली. त्याने ५१ धावांची खेळी केली.
इंग्लंडच्या डावानंतर भारताने खेळायला सुरूवात केली. भारताचे पहिले दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले. १९ धावसंख्या असताना यशस्वी जायसवाल बाद झाला. त्यानंतर लगेचच रोहित शर्मा बाद झाला. रोहितला केवळ २ धावाच करता आल्या. रोहितची बॅट अद्याप धावा काढण्याच्या प्रतीक्षेत आहे.
दोन सलामीवीर झटपट बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी मोर्चा सांभाळला. त्यांनी खेळपट्टीवर टिकून राहत भारताला शंभरीपार नेले. श्रेयस अय्यर ३६ बॉलमध्ये ५९ धावा करून बाद झाला. त्यानंतर गिल अक्षर पटेलच्या साथीने खेळू लागला. अक्षरनेही ५२ धावांची खेळी करत भारताला विजय सहज करून दिला. शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिलेल्या शुभमन गिलने ८७ धावांची खेळी केली. यासोबतच भारताने हा सामना जिंकला.या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.