भंडारा, दि.12: जिल्हयातील युवकांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी युवकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा स्तरावर युवा पुरस्कार दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिनी शासनामार्फत देण्यात येत आहे. जिल्ह्यातील युवक -युवती व संस्थांनी पुरस्कारासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुरस्काराचे स्वरुप
जिल्हा युवा पुरस्कार जिल्हा स्तरावर एक युवक, एका युवतीस आणि एका नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येईल. या पुरस्काराचे स्वरुप गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख पुरस्कार व्यक्ती दहा हजार रुपये – (प्रती युवक व युवती) व संस्थेसाठी गौरव पत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम ५० हजार रुपये अशा स्वरुपाचा असेल.
युवक, युवती व संस्थांनी २८ फेब्रुवारीपर्यंत एका प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा येथे सिलबंद लिफाफ्यात अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांनी केले आहे. तसेच अर्ज प्राप्त करून व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कळविले आहे