सौंदड येथे शुभम भैसारे यांचे सन्मानार्थ अभिनंदन रॅली

0
54

सडक अर्जुनी,दि.13-सौंदड येथील मुळ निवासी शुभम भैसारे यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या युपीएससी परीक्षेत संपूर्ण भारतातून ९७ वी रॅक मिळवून उत्तीर्ण झाल्याने सौंदड येथील बुद्ध विहार समिती व सौंदड ग्राम वासीयांनी शुभम यांचे अभिनंदन करण्यासाठी रॅलीचे आयोजन केले होते.

याप्रसंगीगावातील विविध भागातून शोभायात्रा काढण्यात आली जागोजागी सौंदड वासीयांनी शुभम चे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.प्रसंगी मोठ्या प्रमाणात ग्रामवासी उपस्थित होते.शुभम च्या यशामुळे सौंदड गावाचे नाव लौकीक झाल्याचे याप्रसंगी मान्यवरांनी बोलून दाखवले.