Home Top News भाजप सरकारच्या विरोधात अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेसचा मोर्चा-नितिन राऊत

भाजप सरकारच्या विरोधात अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेसचा मोर्चा-नितिन राऊत

0

गोंदिया-राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे असैवंधानिक सरकार असून १९७२ नंतरची मोठी दुष्काळी परिस्थिती निमार्र्ण झालेली असतानाही शेतकर्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राज्यातील केंद्रातील सरकार करीत असल्याचा आरोप काँग्रेस मोर्चा सयोजंन समितीचे प्रमुख नितीन राऊत यांनी केला.तसेच नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस दुष्काळग्रस्तांना मदत,शेतकरी आत्महत्या आणि जवखेडा हत्याकांड आदी मुद्याला घेऊन ८ डिसेंबरला मोर्चा आयोजित केल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आमदार विजङ्म वड्डेटीवार,गोंदिया जिल्हा संपर्क प्रमुख कृष्णराव पांडव,जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, भरत बहेकार,लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष प्रफुल अग्रवाल,अमर वराडे उपस्थित होते.
राऊत म्हणाले की शेतकरी होरपळून निघालेला असताना सरकारचे मंत्री आढावा बैठक व सत्कारात गुंतल्याची टिका करीत कापूस,भुईमूंग,सोयाबीनसह धानाला जे समर्थन मूल्य देण्यासाठी आटापिटा करायचे त्यांनीच सत्तेत येताच भाव दिला नसल्याचा आरोप केला.अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा येथील तिहेरी हत्त्याकांडाचे आरोपी अद्यापही पकडण्ङ्यात सरकारला अपयश आले.राष्ट्रपती राजवटीत घटना घडलेली असतानाही प्रमुख म्हणून राज्यपालांनी त्या गावाला भेट देऊन पीडिताच्या कुटुबांची विचारपूस केली नाही. मुख्यमंत्राकडे गृहमंत्रालाय असतानाही त्यांना त्या पिडीत कुटुंबाची भेट घेण्यास वेळ नाही अशा सरकारकडून न्यायाची अपेक्षा चुकीचे आहे.राज्यातील भाजप सरकार हे दलित विरोधी सरकार असल्याचेही ते म्हणाले. दुष्काळग्रस्त भागातील कोरडवाहू शेतीसाठी २५ हजार रुपङ्मे आणि ङ्कळबागाङ्मतदारासांठी ५० हजार रुपये दर हे्क्टरी शासनाने द्यावे अशी काँग्रेसची मागणी असल्याचे म्हणाले.

Exit mobile version