कोल्हापूर उत्तर काँग्रेसकडे; भाजपच्या सत्यजित कदम यांचा 18,800 मतांनी पराभव करून जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय

0
61

कोल्हापूर-अखेर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे गेले आहे. काँग्रेसच्या जयश्री पाटील यांनी भाजपच्या सत्यजित कदम यांच्या 18 हजार 800 मतांनी पराभव केला आहे. कदम यांना 77,426 मते मिळाली असून जयश्री जाधव यांना 96 हजार 226 मते मिळाली आहेत. पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी 61.19% मतदान झाले होते. महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यासह 15 उमेदवार या निवडणुकीत नशीब आजमावला आहे. पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने चुरस निर्माण झाली होती.

कोल्हापूर उत्तरला मिळाल्या पहिल्या महिला आमदार

विधानसभा निवडणुकीतील माझा विजय हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा, कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा आहे. आण्णांच्या माघारी कोल्हापूरच्या जनतेने माझी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. यापुढील काळात आपल्या सर्वांच्या सहकार्याने शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी माझी आहे आणि विकासासाठी मी कटीबद्ध आहे. असे जयश्री पाटील म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या की, आण्णांनी कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक आराखडे तयार केले आहेत. त्यांचे नियोजनबध्दरित्या पूर्तता करण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे.प्रचारात कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्दे घेऊन मी जनतेच्या समोर गेलो. यावेळी अबालवृद्ध नागरिक, महिला, युवावर्गाकडून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद व पाठिंबा मिळाला. याची प्रचिती मतदानातून मिळाली आहे. कोल्हापूरकरांनी विकासाच्या बाजूने कौल दिला आहे.

मतमोजणीला प्रारंभ

  • 26व्या फेरीत जयश्री जाधव यांना 96,226 मते मिळाली असून, भाजपच्या सत्यजित कदम यांना 77,426 मते मिळाली.
  • 25व्या फेरीत जयश्री जाधव यांना 94,767 मते मिळाली असून, भाजपच्या सत्यजित कदम यांना 76,123 मते मिळाली.
  • 24व्या फेरीत जयश्री जाधव यांना 92,012 मते मिळाली असून, भाजपच्या सत्यजित कदम यांना 73,174 मते मिळाली.
  • 23व्या फेरीत जयश्री जाधव यांना 86,675 मते मिळाली असून, भाजपच्या सत्यजित कदम यांना 70,344 मते मिळाली.
  • 22 व्या फेरीत जयश्री जाधव यांना 83,338 मते मिळाली असून, भाजपच्या सत्यजित कदम यांना 67,813 मते मिळाली
  • 21व्या फेरीत जयश्री जाधव यांना 79,809 मते मिळाली असून, भाजपच्या सत्यजित कदम यांना 64,587 मते मिळाली.
  • 20 व्या फेरीअखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना 76,357 मते मिळाली असून भाजपचे सत्यजित कदम यांना 60,891 मते मिळाली.
  • 19 व्या फेरीअखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना 71,991 मते मिळाली असून भाजपचे सत्यजित कदम यांना 57,891 मते मिळाली.
  • अठराव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना 68,732 मते, तर भाजपचे सत्यजित कदम यांना 54,877 मते
  • सतराव्या फेरीत जयश्री जाधव यांना 64,784 तर भाजपचे सत्यजित कदम यांना 51,688 मते
  • सोळाव्या फेरीअखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना 61,989 मते, तर भाजपचे सत्यजित कदम यांना 48,200 मते
  • पंधराव्या फेरीअखेर जयश्री जाधव आघाडीवर; जाधव यांना 58,351 तर भाजपचे सत्यजित कदम यांना 44,353 मते
  • चौदाव्या फेरीअखेर जयश्री जाधवांना 54,563 मते, तर भाजपच्या सत्यजित कदम यांना 42,297 मते
  • तेराव्या फेरीत काँग्रेसला 8386 मतं तर भाजपला 2432 मतं
  • बाराव्या फेरीत जयश्री जाधव यांना 3946 मते तर सत्यजित कदम यांना 2908 मते मिळाली.
  • अकराव्या फेरीअखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना 42,465 मते, तर भाजपच्या सत्यजित कदम यांना 34,328 मते, अकराव्या फेरीअखेर जयश्री जाधव 8137 मतांनी आघाडीवर
  • दहाव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना 2868 मते तर भाजपच्या सत्यजित कदम यांना 3794 मते. या फेरीत सत्यजित कदम यांना 926 मतांची आघाडी. तर दहाव्या फेरीअखेरीस जयश्री जाधव यांना एकूण 8073 मतांची आघाडी
  • नवव्या फेरीत सत्यजित कदमांना 2937 मतं तर जयश्री जाधवांना 2744 मतं, नवव्या फेरीत भाजपला 193 मतांची लिड
  • आठव्या फेरीत जयश्री जाधव यांना 2981 मतं तर कदम यांना 3505 मतं, आठव्या फेरीत भाजपचे सत्यजित कदम यांना 524 मतांची लिड
  • आठव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना 2981 मते तर भाजपच्या सत्यजित कदम यांना 3505 मते मिळाली. आठव्या फेरीत सत्यजित कदम 524 मतांनी आघाडी घेतली. आतापर्यंत 26 पैकी आठ फेऱ्यांमध्ये मिळून जयश्री कदम यांच्याकडे 9152 मतांची आघाडी आहे.
  • एकूण 26 पैकी 7 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण. सातव्या फेरीअखेर महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव 9676 मतांनी आघाडीवर. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना 3632 मते तर भाजपच्या सत्यजीत कदम यांना 2431 मते. सातव्या फेरीत जयश्री जाधव यांना 1201 मतांची आघाडी
  • सहाव्या फेरीअखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना 27,370 मतं, तर सत्यजित कदम यांना 18,905 मतं

जाधव आघाडीवर होत्या. तर त्या खालोखाल भाजपचे सत्यजित कदम आहेत. मतमोजणी सुरु झाल्यानंतर दुसऱ्या फेरीपर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव 2137 मतांनी आघाडीवर होत्या. जयश्री जाधव यांना 4856 तर भाजपाच्या सत्यजित कदम यांना 2719 मते मिळाली. दुसऱ्या फेरीत जयश्री जाधव यांना 5515 तर सत्यजित कदम यांना 2553 मते मिळाली आहेत. तर तिसऱ्या फेरीमध्ये जयश्री जाधव यांना 4928 तर सत्यजित कदम यांना 2566 मते मिळाली आहेत. तिन्ही फेऱ्यानंतर जयश्री जाधव या 7501 मतांनी आघाडीवर आहेत. चौथ्या फेरीअखेर जयश्री जाधव यांना 3709 मते तर सत्यजित कदम यांना 3937 मते. या फेरीत सत्यजित कदम यांना 228 मतांचे लीड, चौथ्या फेरीअखेरीस जयश्री जाधव 7283 मतांनी आघाडीवर, पाचव्या फेरीत कदमवाडी, जाधववाडीमधील मजमोजणी पूर्ण, जयश्री जाधव यांना 3673 मते, सत्यजित कदम यांना 4198 मते, पाचव्या फेरीअखेरीस जयश्री जाधव यांना एकूण 6758 मतांची आघाडी आहेत.

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने रिक्त झाली होती जागा

या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी काटे की टक्कर आहे. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक पार पडली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप महाविकास आघाडीला धक्का देणार की महाविकास आघाडी ही जागा राखणार, हे आज स्पष्ट होणार आहे. या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपने चांगलाच जोर लावला आहे.

काँग्रेस-भाजपसाठी प्रतिष्ठेची लढत

या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली, तर भाजपकडून महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या राजकारणात सक्रिय असलेल्या सत्यजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती. प्रचारासाठी काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघात तळ ठोकला होता. सतेज पाटील यांचा प्रभाव असलेल्या भागात पोटनिवडणूक होत असल्याने त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर, दुसऱ्या बाजूला भाजपने ही निवडणूक ‘हिंदूत्वा’च्या मुद्यावर केली असल्याचे चित्र आहे. हिंदूत्वाचा मुद्दा उपस्थित करत भाजपने शिवसेनेचा मतदार आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला.