Home Top News नागपुरात वाढलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे होणार नवे लष्करप्रमुख; या पदावर पोहोचणारे...

नागपुरात वाढलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे होणार नवे लष्करप्रमुख; या पदावर पोहोचणारे पहिलेच अभियंते

0

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)– लेफ्टनंट जनरल मनोज पांडे देशाचे नवे लष्करप्रमुख होतील. ते विद्यमान लष्करप्रमुख एम.एम. नरवणे यांची जागा घेतील. नरवणे चालू महिन्याच्या अखेरीस आपल्या पदावरुन सेवानिवृत्त होणार आहेत. मनोज पांडे सध्या उप लष्करप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या रुपात प्रथमच लष्कराच्या सर्वोच्च स्थानी एखादा अभियंता विराजमान होणार आहे.

कोण आहेत मनोज पांडे

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे सध्या उप लष्करप्रमुख म्हणून लष्कराचे नेतृत्व करतात. त्यांनी गत 1 फेब्रुवारी रोजी या पदाची सूत्रे हाती घेतली होती. मनोज पांडे 1982 साली लष्कराच्या कोर ऑफ इंजिनियर्समध्ये भरती झाले. त्यांनी नियंत्रण रेषेसह पल्लनवाला सेक्टरमधील ऑपरेशन पराक्रमवेळी एका इंजिनिअरिंग रेजीमेंटची धूरा सांभाळली होती. जवळपास 4 दशकांच्या लष्करी कारकिर्दीत त्यांनी पश्चिम थिएटरमधील इंजिनिअरिंग ब्रिगेड व एलओसीवरील सेना ब्रिगेडची धूरा सांभाळली आहे. त्यांनी लडाखमधील डोंगराळ प्रदेशातही महत्वपूर्ण कामगिरी केली आहे.

Exit mobile version