संदीप देशपांडेंची आमदार अमोल मिटकरींना धमकी, मनसैनिक कधी संपवतील समजणार नाही

0
27

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली. यावर आता मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे चांगलेच गरम झाले. त्यांनी आमदार अमोल मिटकरींना जरा सांभाळून आमचे मनसैनिक कधी संपवून टाकतील कळणार नाही अशी थेट धमकी दिली.

ट्विट करत देशपांडे यांनी ही धमकी दिली. ते म्हणाले की, राष्ट्रवादीच्या गॅसवर तयार झालेल्या ‘मटणकरीं’नी जरा सांभाळून, ही मटण करी आमचे महाराष्ट्र सैनिक कधी संपवून टाकतील ते कळणार पण नाही. तेंव्हा चड्डीत राहायचे काय समजले? असा धमकी वजा इशारा संदीप देशपांडेंनी मिटकरींना दिला आहे.

काय म्हणाले होते अमोल मिटकरी?
मिटकरी यांनी राज ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. राज ठाकरेंचा त्यांनी खाज ठाकरे म्हणून त्यांनी उल्लेख केला आहे. यावेळी राज ठाकरेंवर बोलताना मिटकरी म्हणाले, पेट्रोल, गॅसवर, डिझेलवर बोलत नाही. मात्र राज ठाकरे चांगल्या नकला करतात, चांगला टाइमपास आहे. अशी खोचक टीका त्यांनी राज ठाकरेंवर केली आहे.

राज ठाकरेंना खाजसाहेब म्हणाले मिटकरी

शरद पवारांवर टीका केली म्हणून राज ठाकरेंना खाजसाहेब बोललो असेही मिटकरी यांनी म्हटले आहे. तर निसर्गाने आम्हालाही दोन हात, पाय, डोके आणि त्यात मेंदू दिला आहे, पण मेंदू कोणाचा गुलाम ठेवायचा यांचे भान दिले आहे. अस टोला अमोल मिटकरी यांनी लगावला आहे. तर मुस्लिम समाजाने हनुमान चालिसेला कधी विरोध केला असा, प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

मिटकरींनी चड्डीत रहावे- देशपांडे
मिटकरी यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी मिटकरींना धमकी वजा इशाराच ट्विट करत दिला आहे. मिटकरी हे राष्ट्रवादीच्या गॅसवर तयार झालेली, मटणकरी आहे. आमचे मनसैनिक त्यांना कधी संपवतील कळणारही नाही. असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे. तर अमोल मिटकरी यांनी चड्डीत रहावे असा सल्ला ही यावेळी त्यांनी दिलाय.

राज ठाकरेंच्या हनुमान चालिसा आणि शरद पवारांनी जातीयवादाला खतपाणी घातले, या विधानांनी राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर खोचक टीका केल्याने आता वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.