बारावीचा यंदाच्या वर्षीचा निकाल जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने या निकालात बाजी मारली आहे. राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के इतका लागला आहे. तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ९४.२२टक्के इतका लागला असून निकालात मुलींनी बाजी मारली आहे. फेब्रुवारी – मार्च २०२०च्या तुलनेत हा निकाल एकूण ३.५६ टक्क्यांनी वाढला आहे.(Maharashtra HSC Board Result News)
विभागवार निकाल खालीलप्रमाणे –
कोकण विभाग: ९७.२१ टक्के
पुणे: ९३.६१
नागपूर: ९६.५२
औरंगाबाद: ९४.९७
मुंबई: ९०.९१
कोल्हापूर: ९५.०७
अमरावती: ९६.३४
नाशिक: ९५.०३
लातूर: ९५.२५
राज्याचा बारावीचा एकूण निकाल ९४.२२ टक्के लागला आहे. त्यापैकी मुलींचा निकाल ९५.३५ टक्के लागला असून मुलांचा निकाल ९३. २९ टक्के लागला आहे. ४ मार्चपासून सुरु झालेल्या बारावीच्या परीक्षेला राज्यात एकूण १४ लाख ८५ हजार ८२६ इतके विद्यार्थी बसले होते. बारावीची परीक्षा ४ मार्च २०२२ ते ३० मार्च २०२२ या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती.
बारावीचा निकाल कोठे पाहायचा?
– www.mahresult.nic.in
– www.hscresult.mkcl.org
– https://hsc.mahresults.org.in
९० टक्क्यांहून अधिक गुण मिळालेले विद्यार्थी –
पुणे: १७२१
नागपूर: १०४६
मुंबई: २७६६
कोल्हापूर: ५९३
अमरावती: १७८३
नाशिक: ६१२
लातूर: ५६३
कोकण: १३८