राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण,रिलायन्स रुग्णालयात दाखल

0
15

मुंबई :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली.त्यांना कोरोना सदृष्य लक्षणं दिसू लागल्यानं त्यांनी कोरोना चाचणी केली. रिलाईन्स हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्रासह मुंबईत गेल्या काही दिवसांपासून एकीकडे कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात राजकीय वारेही वेगानं वाहू लागलेत. या सगळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भूमिका महत्त्वाची ठरते. त्यातच एकनाथ शिंदे हे दुपारी राज्यपालांची भेट घेणार होते. दुपारी घेण्यात येणाऱ्या या भेटीदरम्यान, महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील, अशी शक्यता होती. पण त्याआधीच मोठी घडामोड समोर आली असून आता एकनाथ शिंदे मुंबईला जाणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.