37.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home Top News उद्या बहुमत चाचणी होणार,सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

उद्या बहुमत चाचणी होणार,सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

0
36

blank

उद्या विधानसभेत बहुमताची चाचणी होणार की नाही, ठाकरे सरकारला आपले बहुमत सिद्ध करावे लागणार की नाही याचा निकाल सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांनी जाहिर करत शिवसेना व महाविकास आघाडी सरकारला धक्का दिला आहे.उद्याच्या बहुमत चाचणीला थांबवण्याची याचिका फेटाळत राज्यपालांचा निर्णय कायम ठेवला आहे.या निर्णयामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे उद्या बहुमतचाचणी करतात कि त्या आधी राजीनामा देतात याकडे लक्ष लागले आहे.शिवसेना आणि एकनाथ शिंदे या दोन्ही बाजूंकडून यासंबंधी युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर हा निर्णय दिला आहे.

राज्यपालांनी गुरुवारी विधानसभेमध्ये बहुमत चाचणीचे निर्देश दिले आहेत. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा विषय प्रलंबित असताना बहुमत चाचणीचा आदेश राज्यपाल कसे देऊ शकतात असा आक्षेप घेत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अपात्र आमदारांच्या प्रश्नी न्यायालयात 11 जुलै रोजी सुनावणी आहे, त्यामुळे उद्या होणारी बहुमत चाचणी पुढे ढकलावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली होती. न्यायालयाच्या या निर्णयाने भारतीय राज्यघटनेची पायमल्ली होत असल्याची टिका होत असून न्यायालय आत्ता केंद्रातील सरकारच्या हिताचे निर्णय देत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

blank