गर्भाशयाच्या कर्करोगावर पहिली स्वदेशी लस तयार;सीरमला यश

0
23

नवी दिल्ली-गर्भाशयाच्या कर्करोगावरील लस पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केली आहे. ‘क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस’ ही स्वदेशी लस सीरमने विकसित केली असून सीरम इन्स्टिट्यूट आणि डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ही लस लवकरच बाजारात आणणार आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने अलीकडेच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला गर्भाशयाच्या कर्करोगावरील प्रभावी लस तयार करण्यास परवानगी दिली होती. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांच्या हस्ते आज या बहुप्रतिक्षित लसीचे लाँचिंग होणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्वाड्रिवेलेंट ह्यूमन पॅपिलोमावायरस वॅक्सीन (qHPV)ही पहिली स्वदेशी लस असून ती आज लाँच केली जाणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि बायोटेक्नॉलॉजी विभागाने 1 सप्टेंबर रोजी गर्भाशयाच्या कर्करोगावरील उपचारासाठी स्वदेशी लस विकसित करण्याची योजना आखल्याची माहितीये. 12 जुलै रोजी सीरम इन्स्टिट्यूटच्या qHPV लसीला DCGI कडून मार्केट ऑथरायझेशन मिळाले होते. सध्या या आजारावरील प्रभावी लस भारत सध्या परदेशातून आयात करतो. त्यामुळे त्यासाठी जास्त खर्च येतो. आता ही लस देशातच उपलब्ध झाल्यामुळे लसीवरील खर्च कमी होऊन रुग्णांना अगदी सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (NTAGI)कोविड वर्किंग ग्रुपचे चेअरपर्सन डॉ. एन के अरोरा यांनी सांगितले की, मेड-इन-इंडिया लस लाँच करणे हा एक रोमांचक अनुभव आहे. आम्हाला खूप आनंद होतो आहे की, आमच्या मुली आणि नातवंडांना आता ही बहुप्रतिक्षित लस मिळू शकेल.

काय आहे सर्वाइकल कॅन्सर?

सर्वाइकल कॅन्सर हा कर्करोगाचा एक प्रकार असून तो गर्भाशयाच्या ग्रीवाच्या पेशींमध्ये होतो. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजेच, लैंगिक संक्रमित संसर्ग आहे. हा विषाणू गर्भाशयाच्या कर्करोगासाठी कारणीभूत ठरतो. या कर्करोगावरील प्रभावी लस वय वर्ष नऊ ते 14 वयोगटातील मुलींना दिली जाऊ शकते.