Home Top News केंद्रीय निवडणूक आयोगाचा उध्दव ठाकरेंसह शिंदे गटाला मोठा झटका,शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण...

केंद्रीय निवडणूक आयोगाचा उध्दव ठाकरेंसह शिंदे गटाला मोठा झटका,शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं

0

तर शिवसेना पक्षाचे नावही वापरता येणार नाही

👉🟥🟥👉शिवसेनेला आणि शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह तसेच नावही वापरता येणार नाही.

👉🟪🟪👉तर केंद्रीय निवडणूक आयोगाचा धनुष्यबाणाबद्दल नेमका आदेश काय?

मुंबई:- महाराष्ट्राच्या राजकारणातील खूप मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खूप मोठा झटका बसणारा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरु होती. संपूर्ण महाराष्ट्राचं या सुनावणीकडे लक्ष होतं. शिवसेनेचे अंधेरी पूर्व मतदारसंघाचे दिवंगत आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आहे. त्यामुळे अंधेरी पूर्वची जागा सध्या खाली आहे.दरम्यान 10 ऑक्टोबरपर्यंत नव्या चिन्हासाठी दावा करण्याचे निर्देशही आयोगाकडून देण्यात आले आहेत. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

👉🅾️👉लोकप्रतिनिधीचं निधन झाल्यानंतर पुढच्या सहा महिन्यांमध्ये पोटनिवडणूक घेण्याचा नियम आहे. या नियमानुसार निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. याच निवडणुकीचं कारण सांगत शिंदे गटाकडून धनुष्यबाणाच्या चिन्हावर तातडीने सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने त्यांच्या मागणीची दखल घेत या प्रकरणावर सध्या तात्पुरता निकाल जाहीर केला आहे.या निर्णयानुसार अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेला आणि शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. विशेष म्हणजे शिवसेना पक्षाचं नावदेखील दोन्ही गटांना या पोटनिवडणुकीत वापरता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.

👉🟥👉केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश:-

1) दोन गटांपैकी कोणीही शिवसेना हे नाव वापरू शकणार नाही.

2) दोन्ही गटांपैकी कोणालाही “धनुष्य आणि बाण” हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.

3) दोन्ही गट त्यांच्यासाठी निवडतील अशा नावांनी ओळखले जातील.संबंधित गट, त्यांना हवे असल्यास, त्यांच्या मूळ पक्षाशी जोडणारं चिन्ह निवडू शकतात.

4) दोन्ही गटांना ते निवडतील अशी वेगवेगळी चिन्हे देखील दिली जातील.यासाठी निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून निवड करावी लागेल.

👉🛑👉सध्याच्या पोटनिवडणुकासाठी त्यानुसार, दोन्ही गटांना याद्वारे 10 ऑक्टोबर 2022 दुपारी 01:00 पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. (i) त्यांच्या गटांची नावे ज्याद्वारे त्यांना आयोगाने मान्यता दिली असेल आणि यासाठी, प्राधान्य क्रमाने तीन पर्याय द्या, त्यापैकी कोणीही असू शकतो आयोगाने मंजूर केलेले आणि; (ii) उमेदवारांना जे चिन्ह वाटप केले जाऊ शकतात, जर असतील तर संबंधित गट. ते मध्ये तीन मुक्त चिन्हांची नावे सूचित करू शकतात. त्यांच्या पसंतीचा क्रम, त्यापैकी कोणालाही त्यांच्या उमेदवारांना वाटप केले जाऊ शकते.

Exit mobile version