अंधेरी निवडणुकीसाठी आयोगाचे मॅचफिक्सिंग,👉 लोकशाहीचा मुडदा!🏹🏹’धनुष्यबाण’ चिन्ह गोठवले!!

0
32
  • मुंबई,दि.०९: केंद्रीय निवडणूक आयोगाने फक्त चार तासांच्या बैठकीत आज धक्कादायक निर्णय घेतला आणि शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्हच गोठवले. आयोग एवढय़ावरच थांबला नाही, तर शिवसेना हे नाव स्वतंत्रपणे वापरण्यास मनाई करणारा अंतरिम आदेशही शिवसेनेसह शिंदे गटाला दिला.हे दोन्ही निर्णय अंधेरी पोटनिवडणुकीसाठी असल्याचे आयोगाने म्हटले आहे. सोमवारपर्यंत पक्षाचे नवीन नाव आणि चिन्ह सुचवावे, असे निर्देशही आयोगाने दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. हा तर लोकशाहीचा मुडदा पाडण्याचाच प्रकार असून अंधेरी निवडणुकीसाठी आयोगाने केलेली ही मॅचफिक्सिंग असल्याची संतप्त प्रतिक्रिया जनसामान्यांतून व्यक्त होत आहे.

*👉🈴👉शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे गटाकडून अंधेरी पोटनिवडणुकीसाठी धनुष्यबाण हे चिन्ह मिळावे असा दावा करणारी याचिका निवडणूक आयोगापुढे करण्यात आली होती. यासंदर्भात शिवसेना तसेच शिंदे गटाला शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश आयोगाने दिले होते. त्यानुसार दोन्ही बाजूंकडून शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावर दावा सांगणारी कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली. यानंतर निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या उपस्थितीत पेंद्रीय निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक दिल्लीत पार पडली. सुमारे चार तास झालेल्या या बैठकीनंतर शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह तात्पुरते गोठविण्याचा अंतरिम निर्णय घेण्यात आला.

*👉🅾️👉पक्ष आणि चिन्हाबाबत तीन पर्याय सुचवा*

*धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठविण्याचा निर्णय तात्पुरत्या स्वरूपाचा असून केवळ आगामी निवडणुकीपुरता मर्यादित आहे. शिवसेना पक्ष खरा कुणाचा? याबाबत निवडणूक आयोगापुढे सुरू असलेल्या प्रकरणावर अंतिम निर्णय होईपर्यंत निवडणुकीत कुणालाही शिवसेना हे स्वतंत्र नाव वापरता येणार नाही, मात्र शिवसेना या नावापुढे आपल्या गटाचे नाव देता येईल असे आयोगाने आदेशात म्हटले आहे. निवडणूक चिन्ह व पक्षाच्या नव्या नावासंदर्भात तीन पर्याय सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यंत सुचवावेत असे निर्देश आयोगाने दिले आहेत.

*👉🅾️👉निवडणूक न लढणाऱ्या शिंदे गटाला चिन्ह हवेच कशाला?👉🟥👉 शिवसेनेचा आयोगापुढे जोरदार युक्तिवाद*

शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे शनिवारी लेखी निवेदन सादर केले. या प्रकरणात जोपर्यंत शिवसेना पक्षासंदर्भातील सर्व कागदपत्रे सादर होत नाहीत तोपर्यंत धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबतच्या याचिकेवर सुनावणी करू नये, अशी विनंती शिवसेनेकडून करण्यात आली. अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवारच नाही. मग धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर दावा कशासाठी केला जात आहे, असा जोरदार युक्तीवाद शिवसेनेकडून पेंद्रीय निवडणूक आयोगापुढे करण्यात आला आहे. अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक शिंदे गट लढणार नसल्याची माहिती माध्यमांतून पुढे आली आहे. निवडणुकीत उमेदवारच उतरवणार नसल्याने त्यांना निवडणूक चिन्हाची गरज नाही. केवळ भाजपच्या फायद्यासाठी शिंदे गटाकडून निवडणूक चिन्हा संदर्भातील याचिकेचा खटाटोप करण्यात आल्याचे शिवसेनेने निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिले.

*👉🔴👉शपथपत्रे सादर करण्यासाठी चार आठवड्याचा वेळ मिळावा*

*शिवसेनेकडे अडीच लाखाहून अधिक पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे आणि दहा लाखांपेक्षा अधिक प्राथमिक सदस्यांची शपथपत्रे तयार आहेत. निवडणूक आयोगाने ज्या विहित नमुन्यामध्ये माहिती मागविली आहे. त्या नमुन्यात सादर करण्यासाठी चार आठवडय़ांचा वेळ मिळावा. आता आहे त्या स्थितीत निवडणूक आयोगाला शिवसेनकडे असणारी माहिती हवी असेल तर ती सादर करण्याची तयारी आहे. निवडणूक आयोगाच पथक पाठवून हवे असल्यास याबाबत पाहणी करावी, अशी विनंती शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. त्यानंतर आयोगाने चार तास बैठक घेतली आणि बैठकीनंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा अंतरिम आदेश दिला.

*👉🟪👉लढणार आणि जिंकणारच!*

आम्ही लढणार आणि जिंकणारच, असा निर्धार शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आयोगाच्या निर्णयानंतर व्यक्त केला आहे. खोकेवाल्या गद्दारांनी शनिवारी शिवसेनेचे चिन्ह गोठविण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच. आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते!, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे. आदित्य ठाकरे यांनी फेसबुकवरही हरिवंशराय बच्चन यांची ‘अग्निपथ’ ही कविता पोस्ट करून लढण्याचा निर्धार केला आहे. हरिवंशराय म्हणतात, ‘तू न थकेगा कभी, तू न थमेगा कभी, तू न मुडेगा कभी… कर शपथ! कर शपथ! कर शपथ!… अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ!’

*👉🅾️👉शिवसेनेला बाजू मांडण्याची संधी दिली नाही*

निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. लोकशाहीचा एक महत्त्वाचा स्तंभ म्हणून त्याकडे पाहिले जाते. असे असताना आयोगाकडून हे संपूर्ण प्रकरण व्यवस्थित ऐकून घेतले गेले नाही. याबाबत बाजू मांडण्याची संधी आम्हाला दिली गेली नाही. त्यामुळेच आयोगाच्या निर्णयावर पुढे कोणते कायदेशीर पर्याय आहेत ते आम्ही पडताळत आहोत, असे शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी सांगितले. शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या 40 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिका तसेच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या अनुषंगाने इतर याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. यावरील निर्णयाआधीच निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत काही विपरीत निर्णय दिला तर घडय़ाळाचे काटे उलटे फिरवता येणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करताना शिवसेनेने नमूद केले होते.शनिवारी तेच घडले आहे. आयोगाने आम्ही दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून निर्णय दिला असता तर ते योग्य ठरले असते, असे देसाई यांनी पुढे नमूद केले.

*👉🟥👉निवडणूक आयोगही वेठबिगार झाला!

*ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या संस्था वेठबिगार झाल्याचे आतापर्यंत पाहायला मिळाले होते. आता निवडणूक आयोगही सत्ताधाऱ्यांचा वेठबिगार झाल्याचे आजच्या निर्णयावरून दिसून आले आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते अरविंद सावंत यांनी दिली. आमदारांच्या अपात्रतेबाबत पाच वर्षे निर्णय येणार नाही, असा दावाही मिंधे गटाने केला. त्यात निवडणूक आयोगाचा जो निर्णय आला आहे त्याने लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या जनतेच्या पाठीत खंजीरच खुपसला गेला आहे, असे सावंत म्हणाले. देश हुकूमशाहीकडे चालला आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुनः पुन्हा सांगत आहेत ते म्हणणे खरे ठरले आहे. महाराष्ट्र हे सगळं उघडय़ा डोळय़ांनी पाहतो आहे. शिवसेनेला जितका त्रास द्याल तितकी शिवसेना अधिक बळकट होईल. शिवसेना हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हा पक्ष पुढे चालवत आहेत. शिवसेना हे आमच्या बापाचे नाव आहे. ते कुणीही आले तरी काढून घेऊ शकणार नाही, अशा शब्दांत अरविंद सावंत यांनी ठणकावले. जनता शिवसेनेच्या पाठीशी आहे. महाराष्ट्रातील जनतेने उद्धव ठाकरे यांना कुटुंबप्रमुख मानले आहे. त्यामुळे शिवसेनेचे जे चिन्ह असेल ते महाराष्ट्रातील जनता स्वीकारेल, असेही सावंत यांनी पुढे नमूद केले.