Home Top News शुक्रवारी दुपारी चार वाजता विस्तार

शुक्रवारी दुपारी चार वाजता विस्तार

0

मुंबई – महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा सन्मान राखत भाजप आणि शिवसेनेने सत्तेत एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवार) सांगितले. शिवसेनेचे पाच कॅबिनेट व सात राज्यमंत्री मंत्रिमंडळात सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘जनतेच्या भावनांचा आदर राखत शिवसेना-भाजपने सरकारमध्ये एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारमध्ये शिवसेनेचे एकूण १२ मंत्री असतील. त्यापैकी १० मंत्र्यांचा शपथविधी उद्या होईल. १० मंत्र्यांमध्ये ५ कॅबिनेट आणि ७ राज्यमंत्री असतील. याचबरोबर भाजपच्या ८-१० मंत्र्यांचाही शपथविधी होईल. सर्वांची नावं आज रात्रीपर्यंत निश्चित होतील’, अशी माहिती फडणवीस यांनी पत्रकारांना दिली. विस्तारात मित्र पक्षांच्या समावेशाबाबतचा निर्णयही लवकरच घेतला जाईल, असंही फडणवीस म्हणाले.

‘अनेक-चढ उतारात शिवसेना-भाजप एकत्र होते. २५ वर्षांपासून शिवसेना-भाजपची युती होती. मात्र काही कारणांमुळे आम्ही दूर गेलो होतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यातील सकारात्मक चर्चेनंतर दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. विरोधी पक्षनेते पदाची घोषणा होऊनही आम्ही आता एकत्र आलो आहोत. आगामी काळात महापालिका आणि जिल्हा परिषदांसह इतर सर्व निवडणुका आम्ही युतीकरूनच लढवणार आहोत’, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्राला सौख्य मिळावं या दृष्टीकोणातून युतीचा निर्णय झाला आहे. जनतेच्या भावनेनुसार एकत्र येऊन आम्ही यशस्वीपणे सरकार चालवू, असा विश्वास शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

Exit mobile version