नाटक सूरू असतानाच जेष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांना हृदय विकाराचा झटका, सभागृह सुन्न….

0
20

अमरावती–रंगभूमीसाठी आयुष्य वेचणारे ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचा हृदयविकाराने मृत्यू.
संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात राज्य नाट्य स्पर्धेतील थँक यु मिस्टर ग्लाड हे नाटक सुरू होते. तिथे प्रेक्षागृहात बसून नाटक पाहताना त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि दवाखान्यात नेताना मृत्यू. एका रंगकर्मीने नाट्यगृहातच घेतला अखेरचा श्वास.

अतिशय प्रतिष्ठित असणारा, नाट्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा ” जीवनगौरव पुरस्कार ” नाट्य तपस्वी राजाभाऊ मोरे यांना नुकताच जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
तत्कालीन नाट्य परिषद अध्यक्ष प्रभाकर पणशीकर यांच्या मार्गदर्शनात 33 वर्षां पूर्वी राजाभाऊनी अमरावती नाट्य परिषदेची स्थापना केली आणि आज या नाट्य परिषदेचे जवळपास ५०० सदस्य आहेत. अमरावती शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात सुद्धा राजाभाऊ यांनी नाट्य चळवळ सुरु केली, रुजवली आणि वाढवली. आझाद हिंद मंडळाच्या वतीने सतत ४० वर्ष स्पर्धामध्ये नाटकं सादर केलेत, अनेक पुरस्कार मिळवलेत, शंभरा पेक्षा सुद्धा जास्त नाटकाना दिग्दर्शीत केले, नेपथ्य दिले आणि कोणत्याही नाट्य संस्थेला मदत करण्यास सतत तत्पर आसनारे राजाभाऊ सामाजिक, राजकीय, क्रीडा विभागात सुद्धा सतत कार्यरत असतात.
त्याच्या या रंगभूमीला असलेल्या समर्पित जीवनाचा सन्मान म्हणून हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता.