मुख्यमंत्री शिंदे चार्टर विमानाने जावूनही…; आदित्य ठाकरेंचे गंभीर आरोप

0
15

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी कडाडून टीका केली आहे. चार दिवसांचा खर्च तब्बल ३५ ते ४० कोटी एवढा होता. कर्मशियल विमानाऐवजी ते चार्टर विमानाने गेले. गेले तर गेले पण सकाळी पोहचण्याऐवजी सायंकाळी पोहचले व त्यामुळे महाराष्ट्रासाठीच्या बैठका रद्द केल्या असे आरोप आदित्य ठाकरेंनी केले. मुंबईतील मातोश्री निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आदीत्य ठाकरे म्हणाले की, दावोसच्या भेटीचा अभ्यास केला तर लक्षात येतं तिथं महाराष्ट्र सरकारचा चार दिवसाच कार्यक्रम असेल असं वाटतं.कारण १६ ते २० असा कार्यक्रम ठरला होता. यासाठीचा अंदाजे खर्च जो वाढण्याची शक्यता आहेत. तो साधारणपणे ३५ ते ४० कोटींच्या घरात आहे.अजून खर्च पुढे येऊ शकतो त्यांचा मित्र परिवार गेलेला, त्यांनी वापरलेल्या गाड्या या खोलात जायचं नाही. पण चार दिवसांसाठी प्रत्येक दिवसाचा खर्च मोजला तर तो साडे सात ते १० कोटी खर्च केलेला आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले.

दावोसला जाताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चार्टर विमानाचा वापर केला. याचा खर्च दोन ते अडीच कोटींचा खर्च झाला. तो देखील राज्यावरच आलेला आहे. आक्षेप चार्टर विमानाला नाहीये, पण जेव्हा तुम्ही चार्टर प्लेन वेळेवर पोहचायला घेता की उशीर जायला घेता असा सवाल त्यांनी केला. चार्टर विमानाने जावूनही दावोसला उशीरी पोहचल्याचा आरोप त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केला. मागच्या वर्षी २२ मे २०२२ रोजी डावोसमध्ये आमच्या पव्हेलियनचं सकाळी साडेआठ वाजता केलं. एकनाथ शिंदे जेव्हा गेले तेव्हा ते उद्घाटन पहिल्या दिवशी संध्याकाळी साडेसहा-सात वाजता केलं गेलं. पण ४० कोटींचा खर्च, वेळेवर पोहचण्यासाठी चार्टर विमान असून देखील संध्याकाळी जेव्हा डावोसमधेय पोहचल्यानंतर एक-दोन बैठका झाल्या असतील पण अधिच्या बैठका रद्द झाल्या. कोणी कुठेही त्यांच्या बैठकीचं शेड्यूल कुठंच दिसलं नाही असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना दावोसमध्ये गेलेल्या डेलिगेशनमध्ये कोण होतं? अधिकृत आणि अनाधिकृत कोण होतं? मित्रपरिवार सोबत गेला होता का? गाड्या कुठल्या वापरल्या, ते कुठं राहिले त्यांचा खर्च कोण केला याची उत्तरे मिळाली पाहिजे असे आदित्य ठाकरे म्हणाले. देशातील महत्वाच्य राज्याचे मुख्यमंत्रीच लेट पोहचतात, मग दुसऱ्या दिवशी दोन-तीन जणांना ते कोणाचे माणूस आहेत ते सांगतात आणि संध्याकाळी झपाट्याने परत येतात. हेच सांगायचं होतं तर ज्या ३३ देशांनी तुमच्या गद्दारीची दखल घेतली त्यांना इमेल करु शकला असतात. त्यावर ४० कोटी खर्चण्याची गरज काय होती असेही आदित्य ठाकरे म्हणाले.