Home Top News महाराष्ट्राला तीन ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर

महाराष्ट्राला तीन ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर

0

नवी दिल्ली, दि.25: दैनंदिन जीवनात जनतेच्या संरक्षणासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावणा-या देशातील एकूण 43  मान्यवरांना ‘जीवन रक्षा पदक’  पुरस्कार आज जाहीर झाले. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे.

राष्ट्रपती यांच्या मंजूरीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात येणारे ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार 2022’ जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील रविराज अनिल फडणीस यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’, तर महेश शंकर चोरमले  आणि  सय्यद बाबू शेख यांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर झाला.

तीन श्रेणीत हे पुरस्कार जाहीर झाले असून, देशातील 43 नागरिकांचा समावेश आहे. यातील सात नागरिकांना ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’, दोन नागरिकांना मरणोपरांत पुरस्कार, आठ नागरिकांना  ‘उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झाले. एकूण 28 नागरिकांना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झाले. पुरस्काराचे स्वरूप पदक, केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ताक्षरातील प्रमाणपत्र आणि पुरस्कार राशी असे आहे.

Exit mobile version