मद्यप्रेमींना खुशखबर;पाच दिवस दारु दुकाने बंद राज्य सरकारचे आदेश हायकोर्टाकडून रद्द..

0
18

फक्त मतदानाच्या दिवशीच मद्यविक्री दुकाने बंद

पदवीधर मतदारसंघात निवडणुकीच्या काळात मद्यविक्री करणाऱ्या आस्थापनांवर प्रदीर्घ बंदी घालणे म्हणजे व्यवसायिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाचे नोंदवलं असून अशा प्रतिबंधात्मक बंदीचा आस्थापनात काम करणाऱ्यांच्या उपजिविकेवर थेट परिणाम होतो.असं स्पष्ट करून पदवीधर मतदार संघात फक्त मतदानाच्या दिवशीच मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश हायकोर्टानं राज्य सरकारला दिले आहेत.

30 जानेवारी रोजी राज्यात पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार दिवस आधीपासूनच मद्यविक्रीवर राज्य सरकारकडून मद्य विक्री करणाऱ्या आस्थापनांवर बंदी घालण्यात आली होती.

त्याविरोधात नाशिक, ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांमधील ऑल इंडिया वाइन प्रोड्युसर्स असोसिएशन आणि असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह रिटेल लिकर विक्रेत्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर निर्णय देताना न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने हे आदेश दिले आहेत.