Home Top News सीतारामन यांचा 5वा अर्थसंकल्प, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन:8 वर्षानंतर प्राप्तिकरात सवलतीची अपेक्षा

सीतारामन यांचा 5वा अर्थसंकल्प, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन:8 वर्षानंतर प्राप्तिकरात सवलतीची अपेक्षा

0

अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजता लोकसभेत त्यांचा पाचवा आणि देशाचा 75वा अर्थसंकल्प वाचणार आहेत.गेल्या 4 अर्थसंकल्पात त्यांनी काहीतरी नवीन केले आहे. मग ते ब्रीफकेस वरुन बही खाता असो, पेपर लेस बजेट असो किंवा सर्वात लांब बजेट भाषण असो. यावेळी काय असेल माहित नाही.

भारतात 2019 साली आर्थिक मंदीच्या चर्चांनी जोर धरला होता. केंद्र सरकार आपल्या आर्थिक धोरणांमुळे सातत्याने टीकेचे धनी ठरत होते. याच विरोधांमध्ये केंद्रीय अर्थमंत्री यांचे पती देखील आपल्या लेखणीतून अग्रस्थानी होते. होय, ते होते डॉ. परकला प्रभाकर अर्थातच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती. हे ऐकून धक्का बसणे स्वाभाविकच आहे, पण वैचारिकरित्या या जोडप्यात तफावत आढळणे साहजिकच होते. निर्मला सीतारामन यांचे पारडे भाजपकडे झुकलेले तर डॉ. प्रभाकर हे पूर्वीपासूनच काँग्रेसचा प्रभाव असणाऱ्या कुटुंबातले होते.

आज निर्मला सीतारामन यांच्याविषयीची ही बाब सांगण्याचे कोणतेही वेगळे कारण असू शकत नाही, कारण आज त्या भारताच्या अर्थमंत्री म्हणून पाचव्यांदा केंद्राचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. भारतीय राजकारणातल्या मोठ्या नावांपैकी सीतारामन हे नाव देखील नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात यशाची अनेक टप्पे गाठत होते. देशाच्या अर्थमंत्री म्हणून आपल्या कार्य व कौशल्याने राजकारणात वेगळा ठसा उमटवणाऱ्या सीतारामन आज 1 फेब्रुवारी रोजी (2023-24) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

जेएनयुमध्ये घेतले शिक्षण…

तामिळनाडूच्या मदुराई येथे एका ब्राह्मण कुटुंबात निर्मला सीतारामन यांचा जन्म 18 आँगस्ट 1959 रोजी झाला. वडील नारायण सीतारामन हे रेल्वे प्रशासनात नोकरीला तर आई सावित्री सीतारामन या गृहिणी म्हणून घर सांभाळात असत. वडिलांच्या सततच्या होणाऱ्या बदल्यांमुळे सीतारमन यांना तामिळनाडूच्या अनेक ठिकाणी राहावे लागले. निर्मला सीतारामन यांनी तिरुचिरापल्लीच्या सीतालक्ष्मी रामास्वामी महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केली. पुढे नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले.

काही विशेष घडू शकते. याची तीन कारणे आहेत…

1. यावर्षी 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत.

2. पुढच्या वर्षी लोकसभा निवडणूक आहे, त्याआधीचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे.

3. देशाला सांगण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी सरकारकडे बजेट हे एक मोठे साधन आहे.

आता या गोष्टी थोड्याफार परिचयाच्या आहेत, तरीही आशा देणाऱ्या आहेत… वाचत राहा…

1. प्राप्तिकर: 8 वर्षे झाली, तेव्हापासून काहीही बदललेले नाही. त्यामुळे यावेळी याची व्याप्ती वाढू शकते. शेवटी, सुमारे 8 कोटींहून अधिक करदाते आहेत.

2014 मध्ये, सूट मर्यादा 2.5 लाख रुपये करण्यात आली होती. ती 5 लाखांपर्यंत वाढवता येईल. सवलत वाढवल्यास अल्प उत्पन्न वर्गाला दिलासा मिळेल. काही पैसेही बाजारात येतील. अर्थव्यवस्थेला आधार मिळू शकतो.

2. महागाई: गॅस सिलिंडर 1100 रुपयांचा झाला आहे. त्यांच्या किमती कमी करण्याची व्यवस्था होईल, असे काही जाणते लोक सांगत आहेत. उज्ज्वला योजना 9.58 कोटी लोकांसाठी आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासून त्यांना एका सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी दिली जात आहे. ती आणखी एक वर्ष वाढवता येऊ शकते.

हे छायाचित्र 22 जुलै 2022 चे आहे. काँग्रेस खासदार फुलो देवी नेताम यांनी संसदेच्या आवारात सिलिंडर उचलला होता. महागाईच्या विरोधात विरोधकांच्या निषेधाचे हे सर्वात लोकप्रिय छायाचित्र आहे.
हे छायाचित्र 22 जुलै 2022 चे आहे. काँग्रेस खासदार फुलो देवी नेताम यांनी संसदेच्या आवारात सिलिंडर उचलला होता. महागाईच्या विरोधात विरोधकांच्या निषेधाचे हे सर्वात लोकप्रिय छायाचित्र आहे.

3. रोजगार आणि शैक्षणिक कर्ज: बेरोजगारीवर काहीतरी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी घोषणा होतील. मनरेगासाठी मिळणाऱ्या रकमेतही यंदा वाढ अपेक्षित आहे. पायाभूत सुविधांचे बजेट वाढवून रोजगारही निर्माण होईल.

Exit mobile version